अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
वाहन चोराकडुन दोन दुचाकी गाड्या जप्त!
भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी
प्रतिनिधी: गोपाळ भालेराव
पुणे :दिनांक २४एप्रिल २०२५ रोजी ०२.०० वा ते ०२.०५ वा चे दरम्यान स्पाईस गार्डन हॉटेल लेकटाऊन, पुणे येथे फिर्यादी यांनी त्यांची अॅक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमाक MH12SH0187 ही लॉक करून पार्क केली असता ती कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांची संमतीशिवाय लचाडीच्या इरादयाने चोरी केली आहे म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीव्रुन भारती विदयापीट पोलीस स्टेशनला, गुन्हा रजि नोंद करण्यात आला. गुन्हा नंबर २२२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३-२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्या अनुषंगाने
भारती विद्यानीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार बांना वाहन चोराचा शोध घेण्याबाबतच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार भारती विद्यापील पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे हे वर नमुद गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा आरोपी नाव किरण लक्ष्मण जांभळे, वय ३६ वर्षे, रा. अपर ओटा, ए ३५ रुम नंबर ४. महाडीक मैदानाजवळ, अपर इंदीरानगर, पुणे याने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्या कडुन गुन्ह्यातील चोरीस गेलीली अॅक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमाक MH12SH0187 ही जप्त करण्यात आली आहे.
आरोपीकडून तपासामध्ये भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २०६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३-२ अन्वये गुन्हा उघडकीस आला असुन त्याच्या कडुन नमुद गुन्हयातील यमाहा कंपनीची आर.एक्स.१०० तिचा नंबर M][6689 ही जप्त केली आहे. आरोपीकडुन खालील प्रमाणे वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.१. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २२२/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३-२
२. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर २०६/२०२५, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३-२सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त , पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा , पोलीम सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील सारे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. महाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सादळाराम पु. साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे)राहुलकुगार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मांकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साचळे, सचिन सरपाले, महेश
बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.
