प्रतिनिधी: गोपाळ भालेराव पुणे : दि.२४एप्रिल २०२५ रोजी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ कडील अमंलदार अलंकार पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नं ६९/२०२५. भा.न्या.सं. कलम ३०९(५) या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्टाफमधील पोलीस अंमलदार अमित गद्रे यांना यांच्या बातमीदारामार्फत बातमी वरुन त्यांनी इसम नाव यश दत्ता येळेकर, वय २४ वर्षे, सध्या रा. रुम नं ४०७, ४ था मजला, एसआरए बिल्डींग, ई विंग, विमाननगर पुणे यास ताब्यात घेवुन त्याच्यावर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता सदरचा गुन्हा हा त्याने व त्याच्या इतर २ साथीदारा सह १. चैतन्य गोविंद चापले वय २३ वर्षे, रा. एसआरए बिल्डींग, विमाननगर पुणे, व २. सुजल विकास साखरीया, वय २१ वर्षे, रा. रामवाडी विमाननगर, पुणे. यांचेसह मिळुन केला असल्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कार्यवाही करीता अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे तसेच सदर आरोपीवर यापुर्वी दोन वेळा मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे. श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २. श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक १, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार बिडवई, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीपान पवार, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे पोलीस अंमलदार अमित गद्रे, साईकुमार कारके, अजित शिंदे, रविंद्र लोखंडे, प्रदीप राठोड, मनिषा पुकाळे, महेश पाटील, इरफान पठाण, यांनी केली.
