प्रतिनिधी: गोपाळ भालेराव पुणे :दि.२५/०३/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहितीच्याअनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना जाधवनगर, गोसावी वस्ती येथील नांदेड सिटी लेबर कॅम्प बाजुच्या मोकळ्या जागेत, सिंहगड रोड पुणे येथे दोन इसम नावे १) अरमान रमजान खान, वय-२३ वर्षे रा. जाधवनगर, गोसावी वस्ती, नांदेड फाटा, सिंहगड रोड, पुणे व २) लकी गौरव आनंद, वय-१९ वर्षे रा. भैरवनाथ मंदिराच्या बाजुला, चव्हाण आळी, धायरी, सिंहगड रोड, पुणे हे संशयीतरित्या मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यात एकुण किं. रु. ५४,८००/- चा ऐवज यामध्ये ०२ किलो ४९० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ ४९,८००/- रु.किं.चा, २२ मोकळ्या पारदर्शक पिशव्या. ००/- रु किं.च्या, दोन मोबाईल ५,०००/- रु किं. चे असा असलेला ऐवज व गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला आहे. सदरचा गांजा हा कोठुन आणला याच्या बाबत पोलीस तपास करीत आहेत.
वरील नमुद कार्यवाही ही मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री. निखील पिंगळे, मा. सहा पोलीस आयुक्त. गुन्हे १. श्री. गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार मारुती पारधी, सचिन माळवे, संदिप शिर्के, प्रविण उत्तेकर, सुजीत वाडेकर, रेहाना शेख, यांनी केली आहे.
