प्रतिनिधी : गोपाळ भालेराव घोडेगाव.(पुणे) 27/04/2025 रोजी तब्ब्ल 25 वर्षा नंतर 10 पर्यत शिकत असलेले विध्यार्थी, विध्यार्थीनी 25 वर्षा नंतर चास तालुका आंबेगाव अमराई येथे एकत्र भेटले प्रत्येकाला वाटत होते की पुन्हा एकदा आपण वर्गात येऊन बसलो आहे पण तो वर्ग अगदी मनमोकळा भरला होता तेथे कुठल्या ही प्रकारचा अभ्यास नव्हता आणि 10 वी पर्यंत चे गेलेले दिवस प्रत्येकाने सांगितले आणि कोण कोठे राहतो काय करतो स्वतःची ओळख करून दिली कोण इंजिनिअर, कपंनी मध्ये काम कोण शेतकरी, शिक्षक, तर कोणी व्यवसाय करतो अशा प्रकारे प्रत्येक जन बाहेर गावी राऊन काम करतात तर कोणी गावी शेती व्यवसाय करता प्रत्येक जन त्याच्या कुटुंबातील वेक्ती न सोबत सुख दुःखात सहभागी राहून गेट टुगेदर ला येण्याचा विद्यार्थी यांनी येण्याचा उत्साह दर्शवीला निलेश येवले यांनी विद्यार्थी यांना प्रत्येकाच्या सुख दुःखात आपले मित्र तुमच्या सोबत राहतील असे देखील सांगितले विलास येवले,निलेश येवले,पांडुरंग राऊत, संतोष भवारी, राजेंद्र मिसाळ, निलेश उर्फ बंटी जोगदंन, अंकुश बोनवटे, किशोर आवटे, संतोष लोहकरे, गणेश केदारी, कुंडलिक वावरे, सागर येवले,गणेश वाळुंज,मिलिंद येवले,जितेंद्र लोहाट, मुलीनं मध्ये वैशाली सावंत,सुनीता येवले,उल्का येवले, रुपाली लोहाट,अपेक्षा कोकणे,साधना लोहाट, ललिता लोहट,या विध्यार्थीन मध्ये आज पुन्हा 25 वर्षा नंतर वर्ग भरला. 25 वर्षा नंतर वर्ग भरल्या मुळे आम्ही सर्व विध्यार्थी एकत्र भेटलो त्या मुळे सर्व विध्यार्थी यांनी केक कापून आनंद साजरा केला. आणि विलास येवले यांच्या पत्नी यांनी देखील या विध्यार्थी वर्गाला मोलाची साथ दिली त्यांचे देखील प्रत्येक विध्यार्थी यांनी त्यांचे आभार मानले आणि वर्ग भरलेला असताना प्रथम 25 वर्षानी भेटलेल्या मुला मुलींनी त्याची पुन्हा एकदा त्यांचा परिचय करून दिला विशेष म्हणजे परिचय देताना तमुलींनी लग्ना पूर्वीचे नाव सांगून लग्न नंतर सासरची ओळख उखाणे घेऊन दिली मुलांनी देखील उखाणे घेतले,pt चा तास झाला त्या मध्ये संगीत खुर्ची असे अनेक प्रकारे खेळ झाले नास्ता करण्यासाठी मधली सुट्टी आणि जेवणासाठी दुपारची सुट्टी झाली यात जेवण करण्यासाठी स्पेशल मास वडी, भाकरी,अमरस असा सर्व विध्यार्थी यांनी जेवणाचा अस्वाद घेतला. आणि 5 नंतर शाळेची सुट्टी झाल्यावर प्रत्येक विध्यार्थी यांनी एक भेट वस्तू आणली होती त्या भेट वस्तूवर नंबर टाकून जो विध्यार्थी नंबर बोलण ती भेट वस्तू त्याला आठवण म्हणून देण्यात आली व पुन्हा एकदा चहा घेऊन शाळेची सुट्टी झाली वं निरोप घेऊन सर्व विध्यार्थी स्वह घरी परतले आणि सर्व एकत्र आल्या बदल एक मेकांनी आभार मानले.
अशा प्रकारे पुन्हा एकदा 25 वर्षानी शाळा सूटली पाटी पुटली या म्हणी प्रमाणे सर्व विध्यार्थी यांनी ठरवले की शाळा सुटली आणि पाटी कधीच फुटून द्यायची नाही. ही अशीच दरवर्षी शाळा भरवाची.आणि शेवटी राजेंद्र मिसाळ, निलेश जोगदंड यांच्या सह सर्व विध्यार्थी यांनी ये दोस्ती हम नहीं छोडेंगे या गाण्याने निरोप घेतला.
