एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बाजारपेठेत कोयता नाचवत दहशत पसरविणाऱ्या तिघांच्या शिरूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

बाजारपेठेत कोयता नाचवत दहशत पसरविणाऱ्या तिघांच्या शिरूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या,

शिरूर पोलिसांची कारवाई, संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

शिरूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी शिरूर पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारल्यापासून नेहमीच प्रयत्नशील आहेत, पोलीस ठाणेकडील कर्मचाऱ्यांना सोबत घेवुन शिरूर परिसरांत त्यांची चांगलीच करडी नजर आहे, त्यांच्या कामगिरीवर सर्वसामान्य जनता देखील प्रसन्न आहे, पदभार घेतल्यापासून शिरूर पोलीस ठाणेच्या परिसरांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत, शिरूरच्या बाजारपेठे मधील विशाल कृषी सेवा केंद्रात घुसून कोयत्याच्या धाकाने मारहाण करणाऱ्या तिघां आरोपींना अवघ्या तासांत शिरूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत, या जलद आणि प्रभावी कारवाईने शिरूर पोलिसांनी स्थानिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण केला आहे, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून 5 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता दुकान मालक शिवम शिंदे यांच्यावर परवेज उर्फ पप्प्या पठाण (वय 19 ) रुपेश चित्ते (वय 22)आणि ओंकार जाधव (वय 26) सर्व रा. ताडोंबाची वाडी ) यांनी हा हल्ला केला आहे, आरोपींनी दुकानात गोंधळ घालत शिवीगाळ केली कात्रीने डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले, व कोयत्याच्या धाकाने परिसरांत दहशत पसरवली, अनेक दुकाने बंद झाली आणि नागरिकांनी तिथून पळ काढला संतोष पाचरणे यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी विशेष पथक स्थापन करीत तात्काळ जलद गतीने तपास सुरू केला, अल्पावधीत तिघांना आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला, यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले शहरांत दहशत माजविणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र साबळे हवालदार जगताप आमदार सचिन भोई नितेश थोरात विजय शिंदे निरज पिसाळ निखिल रावडे रवींद्र आव्हाड अजय पाटील यांच्या पथकांने ही कारवाई केली आहे,

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link