शेत तिथे रस्ता गाव तिथे समृद्धीसाठी खासदार उदयनराजेंचा चळवळीच्या पाठीशी
शिव पानंद शेतरस्ते खुले करून हद्द निश्चित करा -मा. खासदार श्रीमंत उदयनराजे भोसले
मा.खासदार श्रीमंत उदयनराजेंमुळे शिव पानंद चळवळीला मोठी उर्जा- शरद पवळे(महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते)*
महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतरस्त्यांच्या प्रश्नावर २१ एप्रिल व २२ एप्रिल रोजी मुंबई आझाद मैदान येथे होणाऱ्या आंदोलनासंदर्भात मा. खासदार श्रीमंत उदयनराजें भोसले यांची जलमंदिर पॅलेसवर महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यां समवंत चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांचा शेतरस्त्यांचा चाललेला संघर्ष त्यावर शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यभर शेत तिथे रस्ता व गाव तिथे समृद्धी अभियान ,जनजागृती,जनआंदन उभारत संवेदनशिल प्रश्नाकडे राज्य सरकारचे प्रश्नासनाचे लक्ष वेधण्याचे काम राज्यभर सुरू असुन यासंदर्भात निवेदन देत मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाची माहिती दिली यावेळी राजेंनी तातडीने महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या निवेदनाची दखल घेत सातारा जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सातारा जिल्हातील शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करण्याच्या सुचना केल्या व आंदोलानातील सर्व शिव पानंद शेतरस्त्यांच्या सरसकट हद्द निश्चित कराव्यात , वहिवाटीच्या रस्त्यांना गाव नकाशावर घ्यावे, तहसिल प्रांत कार्यालयामध्ये प्रलंबित रस्ता केसेस तातडीने निकाली काढाव्यात, शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी , शेतकऱ्यांना मोफत शेतरस्ते देण्याची घोषणा देण्यापेक्षा प्रत्यक्ष कालावधी जाहीर करून मागेल त्याला दर्जेदार शेतरस्ता द्यावा अशा विवीध मागण्या कायदा करून शेतरस्ते कालावधीत पूर्ण करण्याचे जाहीर करावे आदी मागण्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागांसमवेत चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन महराष्ट्र शिवपानंद चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी महाराष्ट्र शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील,सुरेश वाळके सचिन शेळके रविदादा पाटील यांसह चळवळीचे पदाधिकारी उपस्थित होते.
*चौकट- शेतरस्त्यांच्या २१,२२ एप्रिलच्या आझाद मैदान आंदोलनाची मा. खासदार उदयनराजे भोसले यांनी दखल घेत केलेली तातडीच्या कार्यवाहीने शेतकरी भारावुन गेले नक्कीच राज्यातील एकही शेतकरी भाऊ शेतरस्त्या पासून वंचित राहणार नाही असा विश्वास राजांच्या कार्यवाहीमुळे झाला आहे – शरद पवळे/ दादासाहेब जंगले पाटील(महाराष्ट्र सज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळ)*
