रायगड जिल्हा परिषदेच्या नूतन महिला आयएएस अधिकारी नेहाजी भोसले ताई यांनी सीईओ म्हणून पदभार स्वीकारला
रायगड जिल्ह्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार…! संभाजी पुरीगोसावी (रायगड जिल्हा) प्रतिनिधी.
रायगड जिल्ह्याच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेहा.जी भोसले यांनी डॉ. भरत बास्टेवाड यांच्याकडून रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे, यावेळी नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवुन केले, डॉ.भरत बास्टेवाड यांनी जुलै 2023 मध्ये रायगड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता, त्यांची पदोन्नतीने नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे, राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव (सेवा ) व्हि. राधा यांनी सदर आदेश पारित करून त्यांच्या जागी आयएएस अधिकारी नेहा भोसले यांची नियुक्ती केल्या असून त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे, आयएएस अधिकारी नेहा भोसले यांनी सन 2019 मध्ये यूपीएससी परीक्षेत १५वी रॅक मिळवली होती, त्या यापूर्वी हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या, त्यांचा हिंगोली जिल्ह्यातही कार्यकाळ हा उत्कृंष्ट ठरला, नुकताच त्यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे,
