एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

लोणी काळभोर पोलिसांची दमदार कामगिरी : महिलेचा विनयभंग

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

महिलेचा विनयभंग,केल्या प्रकरणी आरोपीविरुध्द पाठवीले २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र.

दिनांक २८/०३/२०२५ रोजी कदमवाकवस्ती गावातील एका शाळेमधील शिक्षीकेवर विनयभंगाचा प्रकार घडला आहे. सदर बाबत पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे आरोपी नाव गणेश सुरेश अंबिके वय ४५ वर्षे रा.लोणी काळभोर पुणे याचेविरुध्द गु. र. नं. १४७/२०२५ बी. एन. एस. कलम ७४, ११५(२), ३५२, ३५१(२) (३) प्रमाणे दि.२८/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असता

सदर गुन्हयातील आरोपीने पिडीत महिला शाळेतील वर्गामध्ये बसल्या असताना, शाळेत जावुन त्यांचेशी महत्वाचे बोलायचे आहे असे सांगुन वर्गाबाहेर बोलावले. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने पिडीत शिक्षीका महिलेचा हात पकडून जवळ ओढून त्यांचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होण्याजोगे कृत्य करुन विनयभंग केला. तसेच पिडीत महिलेस हाताने मारहाण करुन अश्लिल शिवीगाळ केली. त्याबाबत वरिलप्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.

सदर गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक श्री दिगंबर सोनटक्के यांनी सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे जमा करून . तपास अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री दिगंबर सोनटक्के यांनी अवघ्या २४ तासांचे आतच आरोपीविरुध्द सबळ व प्रभावी पुरावे प्राप्त करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याचा कोर्ट केस नंबर १६३०/२०२५ दि. २९/०३/२०२५ असा आहे. तसेच यातील आरोपीस दोषारोपपत्रासह मा. न्यायलायात हजर करन्यात आले होते त्यामुळे मा. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिला सुरक्षीतता व महिलांना न्याय देण्याचे उदात्त हेतुने, महिलांविरुध्दचे विनयभंगांचे गुन्हयाचा तपास अतिशय शिघ्रगतीने पूर्ण करुन २४ तासांचे आत आरोपीसह मा.न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणेबाबत आदेश निर्गमीत केले आहेत. त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर श्री राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर श्री. राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी श्री दिगंबर सोनटक्के व दप्तरी पोलीस अंमलदार अमोल जाधव यांनी सदर गुन्हयाचा तपास २४ तासांचे आत पुर्ण करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषोरोपपत्र दाखल करुन पिडीत महिलेस न्याय देण्याचे दृष्टीने प्रभावी प्रयत्न केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link