अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात.
पुणे :दिनांक 30 मार्च 2025 आरोपी गोविंद बाबुराव जगताप व मयत साक्षी गोविंद जगताप पती-पत्नी होते. सदर घटना ही दिनांक १०/१२/२०१५ रोजी राठी यांचे प्लॉटमध्ये, वर्धमान लॉजचे शेजारी गंगाधाम रोड, बिबवेवाडी, पुणे येथे घडली आहे. यातील आरोपी गोविंद जगताप याचे त्याच्या मामीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरुन आरोपीची पत्नी साक्षी जगताप व आरोपी गोविंद जगताप यांच्यामध्ये सतत वाद होत असल्याने कपडे आणण्याचा बहाणा करुन आरोपीने साक्षी हिस राठी यांचे प्लॉट मध्ये वर्धमान लॉजचे शेजारी, गंगाधाम रोड, बिबवेवाडी, पुणे येथे घेऊन जाऊन तिच्या डोक्यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी करुन तिला जिवे ठार मारल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक १६०/२०१५ भा.दं.वि. कलम ३०२, ४०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पाटील, यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा.न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. २८१/२०१६ असा आहे. वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक २९/०३/२०२५ रोजी आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर खटला मा. पोलीस उप आयक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी दत्तक घेतला असून त्यांनी खटल्याच्या निकालासाठी कार्ट पैरवी याना विशेष मार्गदर्शन केले सदर खटल्याकरीता सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. अनिल कुंभार, कार्ट पैरवी अधिकारी संजय जाधव, पोलीस अंमलदार ए.एन. केंगले, म. पोलीस अंमलदार मुल्ला, एस. व्ही. पुणेकर यांनी कामकाज पाहिले.
सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी श्रेणीपोउनि संजय जाधव, पोलीस अंमलदार ए.एन. कॅगले, म.पोलीस अंमलदार मुल्ला, एस.व्ही. पुणकेर व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पाटील, सध्या नेमणुक कासारवडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.बिबवेवाडी पोलीस ठाणे अंतर्गत खूनाच्या गुन्हयातील आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली
यातील आरोपी गोविंद बाबुराव जगताप व मयत साक्षी गोविंद जगताप पती-पत्नी होते. सदर घटना ही दिनांक १०/१२/२०१५ रोजी राठी यांचे प्लॉटमध्ये, वर्धमान लॉजचे शेजारी गंगाधाम रोड, बिबवेवाडी, पुणे येथे घडली आहे. यातील आरोपी गोविंद जगताप याचे त्याच्या मामीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे संशयावरुन आरोपीची पत्नी साक्षी जगताप व आरोपी गोविंद जगताप यांच्यामध्ये सतत वाद होत असल्याने कपडे आणण्याचा बहाणा करुन आरोपीने साक्षी हिस राठी यांचे प्लॉट मध्ये वर्धमान लॉजचे शेजारी, गंगाधाम रोड, बिबवेवाडी, पुणे येथे घेऊन जाऊन तिच्या डोक्यामध्ये लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी करुन तिला जिवे ठार मारल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक १६०/२०१५ भा.दं.वि. कलम ३०२, ४०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पाटील, यांनी केला व यातील आरोपींविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपत्र सादर केले. सदर केसचा सेशन केस क्र. २८१/२०१६ असा आहे. वरील प्रकरणामध्ये सबळ साक्षीपुराव्याअंती मा. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपीस दिनांक २९/०३/२०२५ रोजी आजन्म कारावास व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
सदर खटला मा. पोलीस उप आयक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी दत्तक घेतला असून त्यांनी खटल्याच्या निकालासाठी कार्ट पैरवी याना विशेष मार्गदर्शन केले सदर खटल्याकरीता सरकारी पक्षातर्फे सहा. सरकारी वकील श्री. अनिल कुंभार, कार्ट पैरवी अधिकारी संजय जाधव, पोलीस अंमलदार ए.एन. केंगले, म. पोलीस अंमलदार मुल्ला, एस. व्ही. पुणेकर यांनी कामकाज पाहिले.
सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे यांनी कोर्ट पैरवी श्रेणीपोउनि संजय जाधव, पोलीस अंमलदार ए.एन. कॅगले, म.पोलीस अंमलदार मुल्ला, एस.व्ही. पुणकेर व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुनिल पाटील, सध्या नेमणुक कासारवडवली पोलीस ठाणे, ठाणे शहर यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.
