कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचे अपघाती निधंन, महाराष्ट्र पोलीस दलात शोककळा .
प्रतिनिधी. संभाजी पूरीगोसावी
कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे डॉ. सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. डॉ. सुधाकर पठारे हे 2011 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळवणे गावचे ते सुपुत्र आहेत. त्यांनी आतापर्यंत अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर वसई तर पोलीस अधीक्षक सीआयडी अमरावती येथे सेवा बजावली आहे, पोलीस उपायुक्त म्हणून मुंबई ठाणे पुणे वाशी नवी मुंबई ठाणे शहर येथे सेवा बजावली आहे, एसपी डॉ. सुधाकर पठारे यांनी पोलीस खात्यात सेवा बजावताना संघटित गुन्हेगारी ( मोक्का ) तडीपारी एमपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला होता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलात अनेक विविध उपक्रम राबविले होते. आपणांस कळवताना अत्यंत दुःख होत आहे. आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मध्ये गेले तीन वर्षापासून कार्यरत असणारे आणि नेहमीच रोखठोक ग्रुपचे विशेष कौतुक करणारे… आणि डिसेंबर महिन्यांत सातारा जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झालेले आयपीएस अधिकारी डॉ.सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाले खरंच जो आवडी सर्वांना तोचि आवड देवाला, खरंच आदरणीय साहेबांना श्रद्धांजली वाहताना हृदय भरून येत आहे. आम्हांला अशी वेळ येईल असं कधीच वाटलं नव्हतं, पोलीस अधीक्षक म्हणून साताऱ्यात नियुक्ती झाल्यावर मी स्वतः संपर्क करून साहेबांना शुभेच्छा दिल्या होत्या :- संभाजी पुरीगोसावी सातारकर








