एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगला कुदळवाडी चिखली पोलिसांनी घेतले ताब्यातदेशींना

भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बंगलादेशी नागरिकांना कुदळवाडी भागातुन चिखली पोलीसांनी घेतले ताब्यात
चिखली (कुदळ वाडी)

पुणे जिल्हा सहसंपादक गोपाळ भालेराव

दिनांक २७मार्च २०२५ रोजी सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली आहे की, रविरंजन काट्याजवळ, देहु आळंदी रोड, कुदळवाडी, चिखली पुणे या ठिकाणी एक बांगलादेशी नागरिकत्व असलेले जोडपे थांबलेले असुन त्यांचेसोबत एक मुलगा व एक लहान बाळ आहे.” अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीची माहिती मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल साळुंखे चिखली पोलीस स्टेशन यांना सांगुन त्यांनी सदर बातमीची माहिती मा.श्री. डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडल-३, पिंपरी चिंचवड व मा. श्री. अनिल कोळी, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग, पिं.चि. यांना कळविले असता, त्यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री.राम गोमारे, पोहवा/८०३ सावंत, पोहया/४७८ गर्जे, पोहचा/२९३१ तारळकर, पोना/१८५४ कांबळे, पोना/१८१३ सुतार, पोशि/३३८९ भोर, मपोशि/३७८७ तळेकर असे सर्व मिळुन पंचासह बातमीचे ठिकाणी रविरंजन काट्याजवळ, देहु आळंदी रोड, कुदळवाडी, चिखली पुणे येथे सार्वजनिक रोडवर जावुन पाहिले असता, तेथे मिळालेल्या बातमीप्रमाणे एक जोडपे थांबलेले असुन त्यांचेसोबत एक मुलगा व एक लहान बाळ असल्याचे दिसले. त्यांना त्याठिकाणी पकडुन त्यांचे नाव पत्ते विचारले असता, त्यांनी त्यांचे नावे अनुक्रमे

१) अकलिमा मोहम्मद राणा शेख वय ३० वर्षे २) मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख वय ३३ वर्षे ३) विधीसंघर्षीत बालक वय १७ वर्षे, ४) लहान बालक वय १ वर्षे ०३ महिने रा. सर्व पी.सी.एम.सी. शाळेशेजारी, तळवडे गावठाण, तळवडे पुणे असे सांगितले. त्यांना भारत देशाबाबत सामान्य प्रश्न विचारले असता, त्याची उत्तरे ते नीट देवु शकत नसल्याने ते भारताचे नागरिक नसल्याचा संशय आला, त्यामुळे इसम मोहम्मद राणा शेख याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टचे समोरील डाव्या खिशामध्ये भारत निर्वाचन आयोगाचे निवडणुक ओळखपत्र मिळून आले. तसेच पॅन्टच्या खिशामध्येच एक विवो कंपनीचा मोबाईल फोन मिळुन आला त्याची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यातील व्हॉटसअॅपमध्ये Aklema नावाने एक मोबाईल क्रमांक सेव्ह केला असून चॅटिंगमध्ये PEOPLES REPUBLIC OF BANGLADESH या देशाचे पासपोर्टचा त्यावर AKLIMA AKTER असे नाव असुन Nationlity- Bangladeshi पत्ता WEST DHARMAGANJ, FATULLAH ANAYET NAGAR 1421 NARAYANGANJ असे नमुद असलेला फोटो दिसुन आला. तसेच त्यामध्ये PEOPLES REPUBLIC OF BANGLADESH या देशाचे पासपोर्टचा त्यावर विधीसंघर्षग्रस्त बालकाचे नाव असुन Nationlity- Bangladeshi पत्ता WEST DHARMAGANJ, FATULLAH ANAYET NAGAR 1421 NARAYANGANJ असे नमुद असलेला फोटो दिसुन आला. त्यामुळे पथकाला सदरचे जोडपे व मुले बांग्लादेशी असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर महिला नामे अकलिमा मोहम्मद राणा शेख हिला विश्वासात घेवुन विचारणा केली असता तिने सांगितले की, “मी बांगलादेशची नागरिक असुन यापुर्वी माझे वसीम रईसुद्दीन बेपारी मुळ गाव वेस्ट धरमगंज, फतुल्लाह अनायतनगर, १४२१, नारायणगंज देश बांग्लादेश याचेसोबत लग्न झाले होते. त्याचेपासुन मला ओबायदुल्ला हा मुलगा आहे. मी सन २०१५ मध्ये माझे पती यांचेसोबत भारतामध्ये फिरण्यासाठी आले असता माझी मोहम्मद राणा शेख याचेशी ओळख झाली. त्यानंतर आम्ही दोघे पुन्हा बांग्लादेश येथे गेलो. त्यानंतर मोहम्मद राणा शेख व मी एकमेकांचे मोचाईलद्वारे संपर्कात होतो. त्यातुन पुढे आमचे प्रेम झाले व दिनांक २७/१२/२०२१ रोजी मी व मुलगा ओबायदुल्ला असे भारत देशाच्या दुरिस्ट व्हिजावर विमानाने ढाका येथुन कोलकत्ता मागें मुंबई येथे आलो. तेथुन आम्ही पुणे येथे आलो. त्यानंतर मी व मोहम्मद राणा शेख असे आम्ही लग्न केले व आता आम्हाला अब्दुल्ला वय १ वर्ष ३ महिने चा मुलगा आहे. मी व माझा मुलगा बांगलादेशी नागरिक असल्याबाबत मोहम्मद राणा शेख यास माहीती होते. आम्ही गेले ३ वर्षापासुन पीसीएमसी शाळेशेजारी, तळवडे गावठाण, तळवडे पुणे येथे भाड्याच्या खोलीमध्ये राहत आहे. तसेच आमचा पासपोर्ट कोणाला सापडु नये यासाठी माझा व मुलगा ओबायदुल्ला याचे पासपोर्ट जाळलेले
आहेत.” अशी हकीकत सांगितली. त्यानंतर त्या सर्वाची अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातुन आधारकार्ड व ०३ मोचाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

इसम नामे मोहम्मद राणा मोहम्मद सलाम शेख वय ३३ वर्षे रा. पीसीसएमसी शाळेशेजारी, तळवडे गावठाण, तळवडे पुणे, मुळ राह मक्दुलनगर, गोला अवादी, अलिगड, राज्य उत्तरप्रदेश याने महिला व बालक बांगलादेशी नागरिक आहेत हे माहीती असुनही त्यांना भारत देशात आश्रय देवुन त्यांचेबाबत कोणाला काही माहीती समजु नये याकरीता त्यांचे पासपोर्ट जाळुन नष्ट केले. तसेच नमुद महिलेशी विवाह करुन त्यांचेपासुन बालक वय १ वर्ष ३ महिने हा मुलगा झाला. तसेच त्यांनी बनावट कागदपत्राच्या सहाय्याने भारतातील आधारकार्ड बनवून घेऊन त्याचे आधारे ते भारतीय नागरिक असल्याचे भासवून वास्तव्य करीत होते. म्हणुन त्यांचे विरुध्द चिखली पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.१७२/२०२५ भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, २०१, २१२, ३४, सह परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १४, १४(अ), पारपत्र अधिनियम १९६७ चे कलम १२ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. शशीकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, मा.श्री. वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त, मा. डॉ. श्री. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडल-३, मा.श्री. अनिल कोळी, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. विठ्ठल साळुंखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन, मा.श्री. अमोल फडतरे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), चिखली पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोहया / चेतन सावंत, पोहया/बाचा गर्जे, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा/संतोष भालेराव, पोहवा/अमर कांबळे, पोहवा / कबीर पिंजारी, पोहवा/सुरज सुतार, पोशि / संतोष सकपाळ, पोशि/संतोष भोर, पोशि/नारायण सोमवंशी, पो.हवा. सोनाली कातोरे, मपोशि काजल तळेकर यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link