एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वर्धा जिल्ह्यातील नेरी (पुनर्वसन) ठरणार राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम

 

वर्धा जिल्ह्यातील नेरी (पुनर्वसन) ठरणार राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम

प्रतिनिधी सतीश कडू

नागपूर, दि. 25 मार्च 2025: सौरऊर्जेचे महत्त्व जाणत वर्धा जिल्ह्या अंतर्गत आर्वी तालुक्यातील नेरी (पुनर्वसन) या गावाने शंभर टक्के सौरग्राम होण्याचा मान मिळवित राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम होण्याचा मान मिळविला आहे ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणीचा प्रत्यय आणित जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून एकी आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर ही किमया करुन दाखविली आहे.

सौर ऊर्जेच्या प्रकाशात झळकणा-या या गावात जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही किमया साध्य करणा-या या गावाने संपुर्ण राज्यापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. महावितरणकडून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील किमान 2 गावे 100 टक्के सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरु असून या मोहिमेंअर्गत वर्धा जिल्ह्यातील चिचघाट-राठीच्या पाठोपाठ या नेरी (पुनर्वसन) गावातील सर्व 132 घरगुती ग्राहक आणि ग्रामपंचायतीने त्यांच्या छतावर सौर ऊर्हा निर्मिती प्रकल्प उभारली आहे. या गावाची सौर ऊर्जेची स्थापित क्षमता सुमारे 150 किलोवॅट झाली आहे.

वर्धा शहरापासून 50किमी तर आर्वी पासुन अवघ्या 2 किमीच्या अंतरावर असलेले आणि महावितरणच्या आर्वी उपविभागा अंतर्गत असलेल्या नेरी (पुनर्वसन) या गावाला सौरग्राम करण्यासाठी आर्वी पंचायत समितीने या गावात जवळपास वर्षभर असलेल्या स्वच्छ सुर्यप्रकाशाचा वापर करून वीज निर्मिती करणाच्या मानस करित महावितरणच्या अवाहनाला अनुकुल प्रतिसाद देत केंद्र शासनाच्या ‘पंतप्रधान सुर्यघर’ – मोफ़त वीज योजनेत सहभागी होण्याचा प्रस्ताव तयार करून वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला, सौरऊर्जेचे महत्व जाणून घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील त्यास अनुकूल प्रतिसाद देत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावास मंजुरी दिली. महावितरण, गावकरी, पंचायत समिती आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या एकत्रित प्रयत्नांतून नेरी (पुनर्वसन) हे गावाचे शंभर टक्के सौर ऊर्जीकरण करुन एकजुटीने ‘सौर’ उड्डाण यशस्वी केले आहे.

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. श्री देवेंद्र फ़डणवीस, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, संचालक (संचालन) अरविंद भादीकर, संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या निरंतर मार्गदर्शनात आणि प्रादेशिक संचालक, नागपूर परेश भागवत, कार्यकारी संचालक (विशेष प्रकल्प) धनंजय औंढेकर, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, वर्धा मंडलाच्या अधीक्षक अभियंता श्री स्मिता पारखी, कार्यकारी अभियंता (प्रशासन) प्रदिप घोरूडे यांच्या विशेष पुढाकाराने आर्वी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत गायकवाड, उपकार्यकारी अभियंता अमित गायकी, सहायक अभियंता रुपेश सोनटक्के प्रधान तंत्रज्ञ रामटेके व बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ श्री पवन मुंजेवार यांच्या अविरत प्रयासाने नेरी (पुनर्वसन) या गावाला विदर्भातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान मिळाला आहे.

फोटो ओळ: राज्यातील सर्वात मोठे सौरग्राम ठरलेल्या नेरी (पुनर्वसन) गावातील घरांवरचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प.

 

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link