एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर जीवन गाणे गातच जावे

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

प्रतिनिधी सतीश कडू नागपूर

नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर
जीवन गाणे गातच जावे
‘कैदयांनी स्वयंनियंत्रण करून सकारात्मक दिशेने वाटचाल करणे ‘
दिनांक 25.03.2025

सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत व अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षणालय, कारागृह व सुधारसेवा कार्यालया ,पुणे यांच्या विशेष सहकार्याने राज्यातील 36 कारागृहात बंदिस्त असलेल्या कैदयामध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या तसेच कैदयांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याऱ्या प्रबोधनात्मक स्वरूप आसणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 25.03.2025 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह,नागपूर येथे करण्यात आले होते.
कैदी बांधवा करीता मनोरंजन, प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा सांस्कृतिक कार्यक्रम राबविन्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश कैदयांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणे व बंदी बांधवांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याकरीता या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक डॉ. अर्चना सिंगम, यांनी केले. कार्यक्रमाचे उदघाटक जिल्हा माहिती आधिकारी, नागपूर मा. श्री.विनोद रापतवार, कारागृहाचे अधीक्षक श्री. वैभव सु.आगे, कार्यक्रम समन्वयक डॉ अर्चना सिंगम, अति.अधिक्षक श्रीमती दीपा आगे, श्रीमती प्रज्ञा पाटील, श्री.कुलदीप कोवे इत्यादी उपस्थित होते.
कैदयांना मार्गदर्शन करतांना मा.श्री.रापतवार साहेब यांनी ‘ दुरीतांचे तीमर जावो’ दुरित म्हणजे पाप, तिमिर म्हणजे अंधार, पापरूपी अंधाराचा नाश होवो. सगळ्या विश्वाने स्वधर्मरूपी सूर्याच्या प्रकाशात पाहावे, मग सर्व प्राण्यांना ज्याला जे हवे असेल ते मिळेल. तसेच बंदयाना सकरात्मक जीवन जगण्याचा तसेच बालकासारखी निरागसाता जोपासण्याचा सल्ला दिला.
कारागृह अधीक्षक श्री. वैभव आगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात, कारागृहात बंदयांसाठी राबविण्यात येत असलेले सुधारात्मक कार्यक्रमाची माहिती दिली. कैदयांच्या प्रगतीसाठी कौशल्य आधारीत असलेले उपक्रम त्यांना कसे मार्गदर्शक ठरणार आहेत याबाद्दल त्यांनी आशावाद व्यक्त केला. तसेच मागील 90 दिवसात 150 बंदयांना कौशल्या प्रशिक्षण दिल्याचे त्यांनी सांगीतले.
गायनांनी मंत्रमुग्घ करणारे श्री. मुकूल पांडे, श्री.उल्हास चिटमुलवार, श्री.विजय साहू ,श्री. पवन गायधने,श्रीमती स्नेहा डोंगरे, श्री.उत्तमराव चिल्हाटे, नृत्य कलाकार, डॉ.दर्शना गडाख डॉ.ऋषभ सिंग, डॉ. रोहिनी पठाडे, कु.भक्ती चौधरी, व कार्यक्रमाला सहाय्यक डॉ. शि वानी राहूत डॉ.लिना कापगते , डॉ. अमोल धनाईत डॉ.नर्मदा मेश्राम, डॉ.ऐश्वर्या धोटे, व कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.यशवंत बनकर, तु.अ.श्रेंणी-2 यांनी केले. कार्यक्रमाला कारागृह अ धिकारी /कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीमती दीपा आगे, अति.अधिक्षक यांनी केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link