सहवेदना अन्नत्याग आंदोलन
स्व. साहेबराव पाटील करपे व मालती ताई पाटील करते यांच्या स्मृती प्रित्यर्थ पंचवटी चौक अमरावती (स्थळ -डॉ पंजाबराव देशमुख पुतळ्याजवळ ) 19 मार्च 2025 बुधवारला एक दिवशीय सहवेदना अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. त्या कार्यक्रमानिमित्त सकाळी दहा वाजता स्व.साहेबराव पाटील करपे व मालतीताई करपे यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ साहित्तिक श्री धनंजय पाटील काकडे, (सरसेनापती शेतकरी आंदोलन समिती. ) यांनी प्रतिमेस फुल माला चढविली, प्रदीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यावेळी किसान पूत्र आंदोलनाचे संयोजक श्री प्रकाशराव साबळे जि. प. सदस्य, तसेच डॉ.रामदासजी रहाटे शेतकरी जेष्ठ नेते, काशिनाथजी फुटाणे ,हिम्मतरावजी बुगुल, सुभाष धोटे पाटील , महेश देशमुख अमरावती, तसेच शिरसगाव कोरडे येथील सरपंच व जाधव ताई माजी सभापती चांदुर रेल्वे कारला , तसेच महिला पत्रकार श्रीमती जोशना कुरवाडे इत्यादी महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. तसेच अमरावती शहरातील प्रतिष्ठित मंडळी व संपूर्ण जिल्ह्यातून आलेली अनेक शेतकरी नेते मंडळी उपस्थित होती.
दुपारी ३.०० वाजता युवा पुरस्कार प्राप्त व बुलढाणा जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त युवा शेतकरी कैलासजी नागरे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही यासाठी उपस्थितानी श्रद्धांजली वाहली . वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष एड. निलेश हेलोंडे पाटील, हे सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते. शेवटी शांती पाठ होवून श्रद्धांजली पर श्री प्रकाशजी साबळे यांनी मार्गदर्शन केले व कार्यक्रम संपलेले जाहीर झाले. कार्यक्रमाला अमरावती जिल्ह्यातून अनेक ठिकानाहून अडीचशे कार्यकर्ते उपस्थित होते.
