अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
ठाणे येथे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता सुसंवाद मेळावा
प्रतिनिधि दौलत सरवणकर
पदाधिकारी कार्यकर्ता सुसंवाद मेळावा खारकर आळी एन के टी सभागृह ठाणे दिनांक:०२:०२:२०२५ रोजी घेण्यात आला त्या वेळी ठाणे जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.मेळावा चे नियोजन मा. खासदार श्री. राजनजी विचारे साहेब आणि मा. ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदारजी दिघे साहेब यांनी केले सर्वप्रथम आनंद नगर चेकनाका येथे मा. खासदार श्री.संजय राऊत आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील मान्यवर यांचे स्वागत मा. खासदार श्री. राजनजी विचारे साहेब आणि मा. ठाणे जिल्हाप्रमुख श्री. केदारजी दिघे साहेब यांनी केले आणि तेथून पुढे टेम्बी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळ्यास हार घालून पुढे त्यांची समाधी शक्तीस्थळ येथे वंदन करून सर्व नेत्यांचा ताफा मेळाव्यासाठी सभागृहा ठिकाणी रवाना झाला आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील मान्यवरांनी शिवसैनिक आणि पदाधिकारी यांस मार्गदर्शन केले.त्या सभे च्या वेळी मा. खासदार संजयजी राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि कार्यक्रम समारोप केला.
