अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
श्रेय वादांच्या लढाईतून झालेल्या खुनाचा वालचंदनगर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासांत लावला छडा, 5 आरोपींना ठोकल्या बेड्या
सौ. कलावती गवळी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी.
निरवांगी (ता.इंदापूर ) जवळील खून प्रकरणातील पाच आरोपींना वालचंदनगर पोलीस व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई करीत अगदी शिताफीने 24 तासांच्या आतमध्ये जेरबंद करून अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला असून. यामध्ये राजेंद्र उर्फ राजू भाळे रामदास उर्फ रामा भोळे नाना भागवत भोळे (रा. सर्वजण खोरोची) शुभम उर्फ दादा आटोळे (रा. शेळगांव) स्वप्निल उर्फ बालाजी वाघमोडे (रा. रेडणी) या पाच आरोपींना अवघ्या 24 तासांमध्ये अटक केली आहे. हे आरोपी हैद्राबादला पळून जाण्याच्या तयारीमध्ये होते. या घटनेमध्ये उत्तम जालिंदर जाधव (वय 34 ) रा.खोरोची यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या आठ जणांनी मयत झालेले उत्तम जालिंदर जाधव यांच्यावर कोयता तलवारीने वार करून लोखंडी रॉडने तसेच पाय दगडाने घेतले होते. या घटनेची नोंद वालचंदनगर पोलिसांत झाली होती. वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी अगदी तातडीने तपासाला सुरुवात करून आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना केली होती. 24 तासांच्या आतमध्ये वालचंदनगर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी वालचंदनगर पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्यासह कर्मचाऱ्यांचे या कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले
