अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
वाई बाजारपेठेतील रामदेव स्टिल दुकानात झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस, वाई पोलीस आणि डी.बी. पथकांची कामगिरी
सौ.कलावती गवळी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील बाजारपेठेतील एका दुकानात डेक्सटॉप, सी.सी.टीव्ही कॅमेरा व १०,०००/- रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल वाई पोलीस आणि डी.बी. पथकांतील तपासी अधिकाऱ्यांकडून हस्तगत करण्यात आला. वाई बाजार पेठेमधील रामदेव स्टिल या भांडयाच्या दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर वाई पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण पथकांसह तात्काळ घटनास्थळास भेट देवुन परिसराची पाहणी केली. व लागलीच वाई गुन्हे प्रकटीकरण पथकास अज्ञात चोरट्याचा शोध घेवुन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी वाई शहरातील विविध सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार विशाल शिंदे यांना तांत्रिक विश्लेषण तसेच त्यांचे बातमीदारांमार्फत बातमी प्राप्त झाली की, रामदेव स्टिल येथे काम करणाऱ्या विधीसंघर्षित बालकानेच दुकानाचे वरील पत्रा उत्चकटुन दुकानात प्रवेश करुन दुकानाच्या गल्यातील सुमारे ९०,०००/- रुपये, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व सीसीटीव्हीची स्क्रिन चोरुन नेली आहे. त्यानंतर प्रभारी अधिकारी श्री. श्याम पानेगांवकर यांनी सदरच्या विधीसंघर्षित बालकाचा शोध घेवुन त्याचेकडुन मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सुचना दिलेनंतर वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरच्या दुकानातील कामगार विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेवून विचारपुस करुन त्याचेकडुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेले १०,०००/- रुपये, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व सीसीटीव्हीची स्क्रिन असा एकुण १,२५,०००/- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुधीर वाळुंज हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समिर शेख,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ .वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी परि. पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगावकर, पोलीस उपनिरीक्षक बिपीन चव्हाण, तपासी पथकांचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, विशाल शिंदे, राम कोळी, नितीन कदम, हेमंत शिंदे, सागर नेवसे, श्रवण राठोड, प्रसाद दुदुस्कर, धीरज नेवसे यांनी केली असुन पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधिक्षक डॉ .वैशाली कडुकर मॅडम यांनी वाई तपासी पथकांचे अभिनंदन केले आहे.
