अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
सोमवार पेठेतील छत्रपती शाहू महाराज उद्यानाचा 75 व्या वर्धापन दिन संपन्न
प्रतिनिधी शंकर जोग
सोमवार पेठेतील के ई एम हॉस्पिटल समोरील पुणे महापालिकेचा छत्रपती शाहू महाराज उद्यानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याने त्याचा वर्धापन दिन शाहू उद्यान ज्येष्ठ नागरिक ग्रुपच्या वतीने साजरा करण्यात आला,
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले होते,
याप्रसंगी उपस्थित नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला होता यावेळी राजू अरोरा, दिलीप बहिरट, बंडू गुजर, रामानंद शेट्टी, सतीश निजामपूरकर, जयवंती राजपूत, निता पवार, मनीषा शिंदे, आदि यावेळी उपस्थित होते
