एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धमाकेदार कामगिरी

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनची धमाकेदार कामगिरी

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर धनकवडी, पुणे शहर ४११०४६४३

दिनांक १८/०२/२०२५

बसमधील वयोवृध्द महीलांचे हातामधील सोन्याची बांगडी चोरी करणाऱ्या आरोपीस अटक

दिनांक १९/०१/२०२५ रोजी दुपारी ०३.३० या चे सुमारास कॉढवाकडे जाणाऱ्या रोडवरील कात्रज बस स्टॉपचर हडपसरकडे जाणारी बस क्रमांक २९१ यामध्ये महीला नामे लक्ष्मी सुरेश वाल्हेकर, वय ६२ वर्षे, रा. सदर ही जात असताना तीन अनोळखी इसमांनी तिच्या हातातील २.५ तोळे वजनाची सोन्याची बांगडी चोरी केली म्हणून तक्रारदार दिगंबर सुरेश वाल्हेकर, वय ३९ वर्षे, धंदा नोकरी, रा. सध्या लोणी काळभोर, भोसले चाळ, प्रभाकर भुजबळ यांचे कडे भाड्याने, ता हवेली, जि. पुणे मुळ गाव कामथडी, ता. भोर, जि. पुणे यांनी दिले तक्रारीवरुन भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ७४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३, (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांनी तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व अंमलदार यांना आरोपींचा तात्काळ शोध घेणेबाबतचे मार्गदर्शन केले होते. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी हे आरोपीचा शोध घेत असताना सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील कृष्णा रमेश माने, वय ४१ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे यांनी केल्याची खात्रीशीर माहीती मिळाली. त्यानुसार आरोपी कृष्णा रमेश माने याचा शोध घेतला असता तो कात्रज कोंढवा रोडवर बस स्टॉपवर मिळून आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक १४/०२/२०२५ रोजी २२.१५ वा अटक करण्यात आली आहे. आरोपीकडे केले तपासमध्ये त्याने कात्रज भागातुन आणखीन वृध्द महीलांचे हातामधील सोन्याच्या बांगडया चोरी केल्याचे सांगितले आहे. आरोपीकडुन २.५ तोळे वजनाची सोन्याची पाटली बांगडी जप्त करण्यात आली असून खालीलप्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत. १. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर ७४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३, (२)

२. भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, गुन्हा रजि नंबर १२९/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३, (२)

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सारे, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगावकर, राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पचार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, यांच्या पथकाने केली आहे.

पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर चोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारकर, चेतन गोरे, मंगेश (सावळाराम पु. साळगावकर)

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link