अजिंक्य महाराष्ट्र नविका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्काराने तुकाराम साळुंखे पाटील सन्मानित.
प्रतिनिधी गोपाळ भालेराव
१६/०२/२०२५ रोजी बाबू जमजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश 9 वी जागतिक युवा प्रतिमा परिषद आणि पुरस्कार सोहळा गोवा येथे पार पडला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर चंद्रकांत कवळेकर गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री , झाकिर खान सिने अभिनेता, डॉ.एस एन पठाण माजी नागपूर विद्यापीठ कुलगुरू, एन एस खोब,डॉ. संदीप खोचर डॉ. बी एन खरात संस्थापक आय आय आर असोसिएशन, डॉ. अशोक कुमार पगाडिया अध्यक्ष महावीर एज्युकेशन सोसायटी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी
जय हिंद महाराष्ट्र राज्य कल्याणकारी बहुउद्देशी संघटना संस्थापक अध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील भाऊसाहेब यांना महात्मा ज्योतिबा फुले राष्ट्रीय पुरस्कार
लातूर जिल्हाचे माजी खासदार सुनील गायकवाड साहेब यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
तुकाराम साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश व संस्थापक अध्यक्ष घडशी समाज संघटना महाराष्ट्र राज्य या पदावर काम करतात
पुरस्कार स्वीकारताना पणजी येथे सरपंच परिषद मध्ये आपले विचार मांडताना कर्तव्य काय या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, संविधान याचा अभ्यास करून सर्वतोपरी सामाजिक भेद न निर्माण करता सर्वांना आपुलकीने वागवणे, व सर्वतोपरी सर्वांना मदत करणे, लोकांच्या अडीअडचणी सोडवणे हेच खरे कर्म ईश्वर .नेहमी चांगले कर्म करतो त्याच्या पाठीशी उभा राहतो शाहू ,फुले, आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेला संदेश याची जोपासना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रमंडळी , नातेवाईक,विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
