एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

साई बिझनेस क्लब तर्फे विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक ज्ञान संमेलन

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी शंकर जोग पुणे

साई बिझनेस क्लब तर्फे विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक ज्ञान संमेलन

देशाला आर्थिक महासत्ता करायचे असेल तर युवकांनी नोकरी देणारे व्हा प्रो, डॉ, कृती वजीर

पुणे: युवकांचा देश म्हणून ख्याती असलेल्या भारत देशाला आर्थिक महासत्ता बनवायचे असेल तर याच युवकांनी आता नोकरी घेणारे नसून नोकरी देणारे होण्याची गरज आहे. व्यवसाय करायला एक चांगली आयडिया तुमच्याकडे असेल आणि मार्केटचा थोडा अभ्यास केला तर तुमचा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. असे मत साई बिझनेस क्लब आयोजित विद्यार्थी व्यवसायिक ज्ञान संमेलना प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले.

महाविद्यालयीन विद्यार्थांना व्यवसायिक मार्गदर्शक मिळावे यासाठी साई बिझनेस क्लब द्वारे व्यवसायिक ज्ञान संमेलन चे आयोजन गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी घोले रोड, शिवाजीनगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात करण्यात आले होते. यामध्ये जे.एस.पी.एम युनिव्हर्सिटी पुणे, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज आणि अकेमी गृप ऑफ इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते. साई बिझनेस क्लबच्या संचालिका प्रो. डॉ. कृती वजीर यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत केले.

कार्यक्रमा दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ‘उद्याच्या घडीला सामाजिक उद्योजकांची भूमिका काय असेल’ यावर डॉ. कीर्ती लोणगाणी व डॉ. रविंद्र नांदेडकर यांनी आपली मते व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. खुशाली ओझा यांनी या सत्राचे संचालन केले होते. डॉ. कीर्ती शाह यांनी ‘मेमरी फोकस’ वर लाइव्ह सेशन घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्फूर्ती आणली. ‘ब्रँड तयार करणे आणि विक्री वाढवणे’ या विषयावर प्रसाद गणपुले यांनी विचार मांडून डॉ विद्या नागरे यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. दुसऱ्या चर्चासत्रात डॉ. सुहास जातेगावकर व डॉ. कृती वाजिर यांनी नवीन स्टार्टप्स मधील चॅलेंजेस या विषयावर प्रकाश टाकला. याचे होस्टिंग डॉ. प्रभा सिंग यांनी केले होते.

कार्यक्रमाची सांगता करताना तुमच्या ‘श्री आरोग्यम’च्या नवीन प्रॉडक्टचे लॉन्चिंग आयकर विभाग आयुक्त अजय केशरी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी श्री आरोग्यम चे संचालक सोहम पवार सहपरिवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल, ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल सिसोदिया आणि नादर कनन यांनी तर आभार प्रोफेसर डॉ. कृती वजीर यांनी मानले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link