अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एकासामान्य माणसाचे अनुकूल सुरुवात
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी गणेश तळेकर
मोठ्या संख्येने या आपल्या मायनाक भंडारी ना मानवंदना द्यायला
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ
आयोजित
अपराजित योद्धा मायनाक भंडारी
13 फेब्रुवारी हा दिवस बसरुर स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचा इतिहास
आपल्या मायनाक भंडारी या स्वराज्याच्या पहिल्या आरमार प्रमुखाने दाखवलेल्या पराक्रमाने लिहिला गेला आहे.
बसरूर येथे पोर्तुगीजां विरुद्ध झालेल्या युद्धामध्ये मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाने या युद्धाचे रूपच पालटले या युद्धामध्ये मायनाक भंडारी यांनी पोर्तुगीजांना एवढा मोठा आघात दिला की त्यानंतर कधीही पोर्तुगीज बसरूर मध्ये येवू शकले नाहीत.
आपण मायनाक भंडारी यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला 13 फेब्रुवारी हा दिवस बसरूर स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरा करायचा आहे त्यासाठी आपण शिवाजी पार्क येथील नागरी संघ मध्ये संध्याकाळी 6.30 वाजता जमायचे आहे.
माझी सगळ्या भंडारी बांधवांना नम्र विनंती आहे, आपण सगळ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे.
आपला
श्री. नवीनचंद्र बांदिवडेकर
