अजिंक्य महाराष्ट्र म्युझिक सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी सतीश कडू
नागपूर येथे ‘एक्सक्लुझिव्ह हॅन्डलूम -विशेष हातमाग ‘ प्रदर्शनाचे उद्घाटन
नागपूर ८ फेब्रुवारी २०२५
विदर्भातील कळमेश्वर धापेवाडा, खापा येथे हातमाग कारागिरांच्या कौशल्याद्वारे तयार झालेले हातमागाचे कपडे आणि वस्तू यांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे पॅकेजिंग द्वारे आधुनिक पिढीला आवडतील अशा तयार रीतीने तयार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले .नागपूरच्या सिव्हिल लाईन स्थित दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विणकर सेवा केंद्र नागपूर द्वारे 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित 7 दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते . याप्रसंगी राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने , विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक संदीप ठुबरीकर आणि सहाय्यक संचालक महादेव पवनीकर उपस्थित होते .यावेळी हातमागाचे कपडे परिधान केलेल्या युवतींनी फॅशनशो द्वारे या हातमागातील कपड्यांचे प्रदर्शन सुद्धा केले .सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन दुपारी 1 ते रात्री 9:30 पर्यंत उघडे राहणार आहे .
धापेवाडा खापा येथे कुशल कारागीर होते त्यांच्याद्वारे तयार झालेले हातमागाची कपडे ही गांधीबाग इतवारी या नागपुरातील मुख्य बाजारपेठेत अगोदर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होती परंतु काळानुरूप ही हातमागाची कला लुप्तप्राय होत असल्याने विणकर सेवा केंद्रांच्या योजना अशा हातमाग केलेला प्रोत्साहक ठरतील असे गडकरी यांनी सांगितले . यावेळी त्यांनी धापेवाडा येथे निर्माण होत असलेल्या टेक्सटाईल क्लस्टरच्या माध्यमातून महिलांना हातमाग कापड बनवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे सांगून या महिलांना आर्थिक लाभ सुद्धा होत असून त्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धी येत असल्याचे गडकरी यांनी यावेळी नमूद केले .याप्रसंगी त्यांनी धापेवाडा , कळमेश्वर येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा तर्फे रोडसाइड अम्नेटीजच्या माध्यमातून ‘टेक्स्टाईल शोरूम ‘ देखील उघडण्याची माहिती दिली .
हातमाग कारागिरांचे कौशल्य हे गतकाळात वैभव प्राप्त होते परंतु कालांतराने त्याला पाहिजे तसे वलय मिळाले नाही त्यामुळे ह्या कला लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर आहेत परंतु विणकर सेवा केंद्राच्या तसेच केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या विविध सहाय्यकारी योजनांमुळे या विणकारांना आपले जुने वैभव पुन्हा प्राप्त करण्याची संधी निर्माण झाली आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली कळमेश्वर धापेवाडा येथे हातमाग साड्यांचे क्लस्टर उभारले जात असून येथील महिलांना हातमाग साड्यांच्या विणकामाचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर केला जात असल्याची माहिती या केंद्राचे उपसंचालक संदीप ठुबरीकर यांनी दिली .
.देशाच्या विविध भागातील 50 हातमाग विणकर,सहकारी संस्था,हातमाग महामंडळे,उत्पादक कंपन्या,हस्तकला कारागीर या प्रदर्शनात सहभागी झाल्या असून त्यांच्या वस्तूंची विक्री देखील या दालना मध्ये होत आहे . हे प्रदर्शन 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दुपारी 1 रात्री 9 वाजेपर्यंत खुले राहील. या सात दिवसीयया विशेष हातमाग प्रदर्शनादरम्यान, भरतनाट्यम नृत्य, कथ्थक नृत्य, सुगम संगीत, फॅशन शो, खरेदीदार विक्रेता बैठक, हातमाग विणकामाचे थेट प्रात्यक्षिक, कापडाची छपाई आणि रंगवणे इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मनोरंजनासाठी आणि जागरूकतेसाठी आयोजित केले जाणार आहेत पारंपारिक पाककृतींचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळे खाद्य स्टॉल देखील या प्रदर्शनात उपलब्ध असतील. या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन विणकर सेवा केंद्र नागपूरचे कार्यालय प्रमुख आणि उपसंचालक संदीप ठुबरीकर यांनी केले आहे.
