अजिंक्य महाराष्ट्र नवले का सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बेलतरोडी, नागपूर शहर.
गोपनीय शाखा पो.स्टे. बेलतरोडी
अजिंक्य महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सतीश कडू नागपूर
मा. सहायक पोलीस आयुक्त सो माहीती कक्ष गुन्हे शाखा नागपुर शहर
विषय: पोलीस ठाणे बेलतरोडी दाखल गुन्हा रजी क्रमांक ९१/२०२५ कलम ३.२५, ३० भारतीय हत्यार कायदा, सहकलम १३५ महा. पो. कायदा.
वरील विषयान्वये सविनय सादर आहे की, आज दिनांक ०८/११/२०२४ रोजी गुप्त बातमीदारांकडुन माहीती मिळाली की, एक इसम त्याचे सोबत जिवंत काडतुस बाळगुन आहे व तो एका मोपेडे वर बेलतरोडी कडुन शताब्दी चौकाकडे जात आहे वरून सदर इसमास पकडने करीता दोन पंचा सह धनश्री अॅग्रो शेतकरी भंडार समोरील सिमेन्ट रोड मंगलदीप सोसायटी येथे सापळा लावला असता तेथे एक व्यक्ती संशयास्पद रितीने त्याचे मोपेडवर समोरून येतांना दिसला वरून सदर इसमास थांबउन सदर संशईत ईसम यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव राजेंन्द्र सदाशिव मानकर वय ६० वर्ष
रा. प्लॉट क. ७०३ रेवती नगर मनिष नगर पो. ठाणे बेलतरोडी नागपुर असे सांगीतले वरून त्याची मिळालेल्या माहीती प्रमाने अंगझडती घेतली असता त्याचे जवळ असलेल्या काळया रंगाचे बॅगचे झडती मध्ये तिन पितळी जिवंत काडतुस त्यामध्ये दोन मोठे पितळी जिवंत काडतुस ज्याच्या वरील क OFV86-7.62-N80 असे लिहीलेले किमंती 1000/- रूपये व OFV88-7.62-M80 असे लिहीलेले किमंती 1000/- रूपये व एक 9 MM चा पितळी जिवंत कारतुस ज्याचे वर 9MM2Z असे लिहीलेले किमंती 500/- रूपये तसेच तिन लहान चाकु किमंती 120/-रूपयाचा तसेच एक बंद स्थितीत आय फोन अंदाजे किमंती 15,000 रूपये तसेच ओपो कंपनीचा ब्राउन लेदर चे कव्हर असलेला मोबाईल किमंती 12,000/- रूपये व चेतक मोपेड गाडी क. MH-49-CM-0696 अंदा. किमती 1,10,000/- रूपये असा एकुन 1,39,620/- रूपयाचा मुद्दताल मिळुन आल्याने दोन पंचा समक्ष जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात येवून ताब्यात घेतले आहे. नमुद आरोपीचे सदरचे कृत्य कलम ३,२५, ३० भारतीय हत्यार कायदा, सहकलम १३५ महा. पो. कायदा अन्वये होत असल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास चालु आहे.
सदरची उत्कृष्ठ कारवाई ही मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ नागपुर व मा. सहायक पोलीस आयुक्त साो. अजनी विभाग नागपुर शहर यांचे मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, सपोनि राम कांडुरे, पोउपनि नारायण घोडके, पोउपनी किशोर माळोकर, तपास पथकाचे पो. हवा. शैलेश बडोदेकर, सचिन लाचरवार, नापोअ नितीन गुंडवार, पो.अं. हेमंत उईके यांनी केलेली आहे.
