अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात
प्रतिनिधी शंकर जोग पुणे
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मॉर्डन मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने १०० दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप,
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत मॉर्डन मोटर ड्रायव्हिंग स्कूल मोदीखाना पुणे कॅम्प, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य, प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे व वाहतूक शाखा पुणे लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प येथील बाटा चौक येथे ५० दुचाकीस्वारांना व ५० पुरुष दुचाकीस्वारांना मोफत हेल्मेट वाटप प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणेचे मोटर वाहन निरीक्षक जयवंत पोळ व पुणे मोटर वाहन निरीक्षक राणी वपेॅ यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजू घाटोळे मॉर्डन मोटर ड्रायव्हिंग स्कूल पुणे कॅम्प संचालक अब्दुल्ला काझी, महादेव देसाई पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर गायकवाड, हवालदार संगीता जाधव, किरण राऊत, प्रियंका बनकर, मंगला पवार, आकाश गायकवाड, तन्वीर शेख, शरद मुळीक आदि यावेळी उपस्थित होते,
या कार्यक्रमाचे आयोजन मॉर्डन मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अब्दुल्ला काझी यांनी केले होते एक सामाजिक उपक्रम खुप छान पार पडला
