अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
संपादकीय
कोंढवे धावडे – ज्येष्ठ नागरिक संघ शिवणे परिसर या ज्येष्ठ नागरिकांनी अठराव्या वर्धापन दिनानिमित्त कोंढवे धावडे गावाचे माजी सरपंच श्री नितीन भाऊ धावडे यांच्या सौजन्याने उत्तम नगर पोलीस ठाण्याचे रायटर मा. श्री. धनंजयजी बिटले साहेब यांच्या शुभहस्ते ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात केली..
या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात नाव लौकिक केलेले साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत यांचा सन्मान आमदार भीमराव अण्णा तापकीर यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी आपलं कामच जर का प्रामाणिक असेल हेतू शुद्ध असेल आणि जरी कोणी अशा वेळेस सोबत नसेल तरीही तुमच्या कामाची आणि कार्याची पोच ही फळ मिळेल न मिळेल याची वाट न पाहता भगवंत त्याची पोच देतोच असे मनोगत आमदारांनी यावेळी व्यक्त केले
तसेच वयाची 80 वर्ष पूर्ण केलेली आहेत ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांनाही करण्यात आले सौ शामला जोशी गायन, श्री यशवंत बुचके कराओके गायक, श्री अर्जुन पिल्ले बॅडमिंटन, सौ जोशना चांदगुडे कवयित्री, श्री किसन घुले सामाजिक कार्यकर्ते, सलीम भाई शेख लोकमत पत्रकार या सर्वांना विशेष कामगिरीनिमित्त सन्मानित करण्यात आले.
सिम्बॉयसिस विद्यापीठ रुग्णालय आणि संशोधन केंद्र यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते त्याचप्रमाणे भव्य समाज प्रबोधन, आरोग्य विषयी डॉक्टर प्रियदर्शनी कुलकर्णी यांचंही मार्गदर्शन ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आले खडकवासला मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव अण्णा तापकीर सलग चार वेळेस विजयी झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे त्यांनाही सन्मानित करण्यात आले
या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीरामजी कुलकर्णी व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले होते
या कार्यक्रमाला भाजपा नेते अरुण भाऊ दांगट, स्वीकृत नगरसेवक सचिन भाऊ दांगट, माजी सरपंच नितीन भाऊ धावडे , यांची प्रमुख उपस्थिती लाभली
अतिशय सुंदर असं सूत्रसंचालन जगताप सर यांनी केले
सर्वांच्या वतीने श्रीराम कुलकर्णी यांनी आभार मानले
