अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी दौलत सरवणकर
मा.बाळासाहेब ठाकरे म्हणजे शौर्य आणी शक्ती!! साहेब म्हणजे संघर्ष!! साहेब म्हणजे प्रखर राष्ट्राभिमानी आणी देशाभिमानी, शिवरायां प्रमाणे साहेब म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. शिवसेनेला मारणारे मेले आणी शिवसेना अमर झाली. ७ ते १० फेब्रुवारी १९६९ साली साहेबांना बेळगाव प्रश्नी अटक झाली त्या नंतर मुंबई पेटली ती शेवटी तुरुंगातुन बाळा साहेबांनी केलेल्या आव्हाहाना मुळे शांत झाली. संबध हिंदुस्तानाला गदागदा हलवणारे ते ४ दिवस होते. सरकार हतबल झाले. महाराष्ट्राचा, सीमाभागाचा, शिवसेना प्रमुखांचा जयजयकार करीत शिवसैनिक, मराठी माणुस रसत्यावर उतरला. सीमा बांधवांचा भावनांचा निवेदन देण्यासाठी शिवसैनिक माहीमचा रसत्यावर ऐकवटला त्यांना ठोकरुन घायाळ करुन उपपंतप्रधान मोरारजी देसाईंची गाडी भरधाव वेगाने पुढे गेली. ब्रिटीश राजवटीला लाजवेल अशीच दंडुकेशाही सरकारने केली. शिवसेनेचे सीमा आंदोलन असे पेटले की ६९ हुतात्मे घेवुनही ते शांत झाले नाही. तेव्हा येरवडा पुणे तुरुंगात अडकलेल्या शिवसेना प्रमुखांनाचा समोर बलाढ्य सत्ता गुठघे टेकुन उभी राहीली तुम्हीच आता हा वडवानल विझवा शांततेचे आवाहन करा!! साहेबांनी शांततेचे आवाहन केले नसते तर तेव्हाच सरकार बेचिराख झाले असते. साहेब अवघड प्रसंगातही डगमगले नाहीत विचलीत झाले नाहीत त्यांनी युध्द अर्ध्यावर सोडल नाही. सरसेनापती सारखे ते उभे राहीले.
साहेब म्हणजे प्रचंड शक्तीच अशा या महापुरषास त्रिवार मानाचा मुजरा.
पोस्ट लेखक -adv.Ketan More Dada
बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्राचाच
जय महाराष्ट्र जय शिवराय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य उद्धव ठाकरे.
