एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी केला पत्रकारांचा सन्मान 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात

प्रतिनिधी स्वप्निल एरंडोल

एरंडोल – येथे २९ जानेवारी २०२५ रोजी आस्था महिला मंडळातर्फे शहरातील पत्रकारांचा बुके व पेन देऊन गौरव करण्यात आला.विशेष हे की सदर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कधीही प्रसिद्धीची अपेक्षा केली नाही.निस्पृह भावनेने महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.तसेच भाषणबाजी व आभारप्रदर्शनाच्या औपचारिकतेला फाटा देण्यात आला.याप्रसंगी आमदार अमोल पाटील यांच्या धर्मपत्नी मृणालिनीताई पाटील या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड.मोहन शुक्ला हे होते.
यावेळी नंदा शुक्ला यांनी पत्रकारांच्या कार्याबाबत एक कविता सादर केली.शोभा साळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रास्ताविक शितल चौधरी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आस्था महिला मंडळाच्या अध्यक्षा आरती ठाकूर, उपाध्यक्षा नंदा शुक्ला,शोभा साळी, शकुंतला अहिरराव, चंद्रकला जैन,शितल चौधरी,भारती साळुंखे व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आस्था महिला मंडळाच्या लाडक्या बहिणींनी लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविल्याबद्दल उपस्थित पत्रकारांनी त्यांना धन्यवाद दिले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link