एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष योगिताताई गोसावी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित असतात

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

संपादकीय

योगिता ताई त्यांच्या या सामाजिक उपक्रमात महिलांना पण सहभागी करून घेत असतात जेणे करून त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल. योगिता ताई नेहमीच त्यांचा वाढदिवस अनाथ अंध दिव्यांग मुले व वृद्धाश्रमातील वृद्ध माता पिता बंधू भगिनींच्या सोबत साजरा करतात. यावेळेस सिंहगड पायथा येथील सेवधाम या वृद्धाश्रमातील वृद्ध माता भगिनींच्या सोबत वाढदिवस साजरा केला. प्रतिभा ताई पायगुडे ह्या गेली 27 वर्षे हे वृद्धाश्रम मायेच्या ममतेने सांभाळत आहेत. त्यांची काळजी घेत आहेत त्यांना मायेचा आधार दिला आहे.
केक कट करून झाल्यावर अनिल काका यांनी त्यांच्या सुरेल आवाजात अप्रतिम गाणे सादर केले. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप समाधान लाभले. परत नक्की या असे सर्वजण सांगत होते. तुम्ही आलात की आम्हाला खूप छान वाटते असे बोलताना त्यांच्या भावना दाटून आल्या होत्या.
प्रतिभा ताई करत असलेले हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्यास मनापासून सलाम. त्यांचे वय 70 च्या आसपास आहे आणि या वयातही त्या सदाशिव पेठ येथून रोज सकाळी 8 वाजता बसने इतक्या लांब जातात. त्यांचा हा नित्यक्रम कधीच त्या चुकवत नाहीत. त्यांनी त्यांच्या कार्याला वाहून घेतले आहे. अशा व्यक्तींचा सन्मान व्हायलाच पाहिजे म्हणून वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशन व प्रबळ महाराष्ट्र दैनिक यांच्या वतीने प्रतिभा काकुंचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. वसुंधरा परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने बचतगटातील महिलांनी बनवलेले उन्हाळी पदार्थ कुरडई पापड शेवई देण्यात आले. यावेळेस प्रबळ महाराष्ट्रचे संपादक व सूर्योदय सोलर कंपनीचे ओनर कृष्णा देशमुख सर, शशिकला महाडिक व बाऊन्सर रुपाली दोशी उपस्थित होते.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link