अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
संभाजी पुरीगोसावी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी :- देशमुख कुटुंबाला सरकारने लवकरात लवकर न्याय द्यावा :- संभाजी पुरीगोसावी सातारकर (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यांतील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख उर्फ (अण्णा) यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही व त्यांना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार नाही तसेच सरकारने लवकरात लवकर देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा असे वक्तृत्व संभाजी पुरीगोसावी यांनी केले आहे, तसेच या प्रकरणाचा तपास करणारी यंत्रणा ही कोणाच्यातरी दबावाखाली काम करीत असल्याचे बोलले जात आहे, या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा याकरिता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देखील पत्र लिहिले आहे, सरपंच संतोष देशमुख हत्या ही घटना अतिशय काळीमा फासणारी आणि दुर्दैवी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरण: अखेर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्या? बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडकर हा सध्या तुरुंगात आहे, त्याची सध्या कसून चौकशी केली जातेय, आत्तापर्यंत या प्रकरणात जयराम ताटे,महेश केदार,प्रतिक घुले,विष्णू चाटे यांना अटक करण्यात आले आहे, तर मुख्य आरोपी सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार होते, आता या तीन फरार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आहे, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि आणि खून प्रकरणात त्यांचा काय सहभाग आहे? या अनुषंगाने देखील तपास केला जाणार आहे, विष्णू ताटेच्या या कबुलीमुळे आता वाल्मिक कराडकर आणखीन अडचणीत येण्याची शक्यता आहे.
