एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

एरंडोल तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे पत्रकारांचा सत्कार संपन्न.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

प्रतिनिधी -स्वप्निल एरंडोल येथील माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन तर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून एरंडोल शहरातील सर्व पत्रकारांचा व विशेष आतिथींचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे व व्यासपीठावर विशेष सत्कारार्थी एरंडोल तालुक्यातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. मोहन शुक्ला, माजी तहसीलदार अरुण माळी, सामाजिक कार्यकर्ता कृष्णा भाऊ सोनार व एरंडोल तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव अहिरराव, आल्हाद जोशी, रतिलाल पाटिल,तालुकाध्यक्ष सिताराम मराठे होते.

या वेळी प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पत्रकारिता करणे म्हणजे काटेरी मुकुट बाळगणे हे होय व हा काटेरी मुकुट घालून आपल्या बातमीतून सर्वांना न्याय देणे म्हणजे पत्रकारिता करणे. 

निडरपणाने आपले कार्य सुरू ठेवावे असा सल्ला सुद्धा दिला.माजी तहसीलदार अरुण माळी यांनी हायवेवर नेहमी होणाऱ्या अपघाता विषयी पत्रकारांनी बातम्या देऊन ” नाही “च्या अधिकाऱ्यांना जागे करण्याचे काम चांगल्या रीतीने केले असे म्हणून सर्व पत्रकारांचा गौरव केला.ॲड. मोहन शुक्ला यांनी आपले विचार व्यक्त करताना सर्व पत्रकारांना आश्वासित केले की कुठल्या बातमीने तुम्हास कायदेशीर अडचण आली तर मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे परंतु पत्रकारांनी सुद्धा बातमी देताना कायदेशीर अडचण येईल अशी बातमी प्रकाशित करू नये. हायवे वर होणाऱ्या अपघाताविषयी कुठल्या मार्गाने अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गाने जागे करता येईल त्याविषयी सविस्तर माहिती दिली.शेवटी अध्यक्षीय भाषणात अमोल कोल्हे यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना माहिती अधिकार विषयी योग्य ते मार्गदर्शन केले.

सर्व मुख्य अतिथींचा व सर्व पत्रकारांचा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.

या प्रसंगी प्रा. अहिरराव सर , आल्हाद जोशी , रतीलाल पाटील, प्रा.सुधीर शिरसाठ , कमर अली सय्यद , कैलास महाजन , जावेद मुजावर , संजय चौधरी , प्रवीण महाजन ,

दिपक बाविस्कर , पंकज महाजन , शैलेश चौधरी , प्रमोद चौधरी , प्रकाश शिरोळे ,

कुंदन सिंग ठाकूर,उमेश महाजन,दिनेश चव्हाण,स्वप्नील बोरसे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून पाचोरा येथील पंकज पाटील माहिती अधिकार कार्यकर्ता तालुकाध्यक्ष , काशिनाथ सपकाळे माहिती अधिकार कार्यकर्ता जळगाव, गुणवंतराव सोनवणे उपस्थित होते. त्याप्रसंगी त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले तर प्रस्ताविक व आभार प्रदर्शन भरत महाले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता संभाजी पाटील,प्रा.आर. एस. निकुंभ, अरुण गुजर , मधुकर महाजन, राहुल महाजन, सुनील महाजन, अनंत सोनवणे, जगदीश पवार, राजधर महाजन , नितीन ठक्कर, विज्ञान पाटील, तुषार शिंपी,भरत महाले, सोपान माळी अरुण नेटके, प्रभाकर महाजन या सर्वांनी प्रयत्न केले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link