अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात…!
प्रतिनिधी : गोपाळ भालेराव. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक घटकांच्या न्याय व हक्कांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी हवेली तालुक्यातील शिंदवणे येथील पत्रकार गणेश नंदकुमार महाडिक यांची निवड झाली आहे.
ही निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी केली असून, त्यांच्या नियुक्ती पत्रात गणेश महाडिक यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करण्यात आली आहे. पत्रात म्हटले आहे की, “आपण आतापर्यंत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाच्या हितासाठी उत्कृष्ट कार्य केले आहे. आपल्या या कार्याची दखल घेत आपली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. संघटनेच्या पुढील कार्यकारणीची निवड करून अहवाल मुख्य कार्यालय, माहूर येथे सादर करावा. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!”
गणेश महाडिक यांची ही निवड त्यांच्या कार्यक्षेत्रातील पत्रकारांसाठी प्रेरणादायक ठरत आहे. त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरांवरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजहितासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि पत्रकारितेच्या माध्यमातून उभारलेली विश्वासार्हता यामुळे त्यांची निवड अत्यंत योग्य असल्याचे मत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केले आहे.
