एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

स्मरणीय आदरांजली: स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात…!

आज माझ्या राजकीय जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या आणि माझ्या विचारसरणीला व कार्यपद्धतीला दिशा देणाऱ्या स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करत आहे.

सुरेश भाऊ गोरे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते संयम, शांतता, उदारता आणि लोकसेवेची अखंड प्रेरणा देणारे मार्गदर्शक होते. त्यांच्या सहवासातून मी संयमित राजकारण, दूरदृष्टी, आणि समाजहितासाठी झोकून देण्याची वृत्ती शिकली. स्वर्गीय सुरेश भाऊ यांचे जीवन म्हणजे लोकसेवेचा एक आदर्श नमुना आहे.

माझ्या राजकीय प्रवासातील २०१७ सालची जिल्हा परिषद निवडणूक ही एक महत्त्वपूर्ण टप्पा होती. या निवडणुकीत सुरेश भाऊंची साथ, त्यांचे मार्गदर्शन, आणि त्यांच्या अनुभवाचा पाया मला मिळाला. तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये लोकांच्या समस्यांवर काम करण्याची संधी त्यांनी मला दिली. भाऊंच्या खंबीर *पाठिंब्यामुळेच मी लोकसेवेच्या या प्रवासात यशस्वी होऊ शकलो.

आज भाऊंना आपल्यातून गेल्याची अनेक वर्षे झाली आहेत, पण त्यांची शिकवण, त्यांचे विचार, आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली उदारता, सगळ्यांना आपलेसे करण्याची कला, आणि लोकांप्रती असलेली अपार तळमळ यामुळे ते कायम स्मरणात राहतील.

त्यांच्या जयंतीनिमित्त मी वचन देतो की, त्यांच्या आदर्शांवर चालत, त्यांच्या शिकवणीला पुढे नेऊन, खेड तालुक्यातील लोकांसाठी अहोरात्र कार्यरत राहीन.

स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या विचारांना व कार्याला शतशः नमन करतो. भाऊ, आपण जरी आज आपल्या सोबत नसला, तरी आपली शिकवण आणि प्रेरणा सदैव आमच्या सोबत आहे. आपण घालून दिलेल्या मार्गावर चालत राहण्याचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करतो.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link