एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांना महावितरणचे अभिवादन

नागपूर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी सतिश कडु 

नागपूर दि. 25 डिसेंबर 2024: – ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या, माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फ़े त्यांना अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका जबावणा-या श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला महावितरणच्या काटोल मार्गावरील विद्युत भवन कार्यालयात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके यांनी माल्यार्पण करीत अभिवादन केले. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री सचिन लहाने यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फ़ोटो ओळ – माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना मुख्य अभियंता श्री दिलीप दोडके.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link