एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत रूपाली चाकणकर पोहोचल्या रत्नागिरी दौऱ्यावर

रत्नागिरी | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी 

महिला आयोग आपल्या दारी, या उपक्रमांतर्गत रूपाली चाकणकर पोहोचल्या रत्नागिरी दौऱ्यावर संभाजी पुरीगोसावी (रत्नागिरी जिल्हा ) प्रतिनिधी. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, यासाठी हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असे प्रतिपादन राज्य महिला आयोगांच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांनी केले आहे, जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित महिला आयोग आपल्या दारी, कार्यक्रमतर्गंत जन सुनावणी यावेळी त्या बोलत होत्या, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अतिष शिंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीकांत हावळे उपस्थित होते, महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यांत दौरा आयोजित करण्यात आला आहे, या दौऱ्याची सुरुवात ही रत्नागिरी जिल्ह्यापासून होत आहे असे सांगून राज्य महिला आयोगाकडे अहवालानुसार रत्नागिरी जिल्हा महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहे, असेही उद्गागार श्रीमती रूपाली चाकणकरांनी काढले आहेत, जनसुनावणीसाठी आलेल्या तक्रारींच्या कौटुंबिक,हिंसाचार बालविवाह,हुंडाबळी यासारख्या तक्रारीचे निराकरण करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग नेहमीच प्रयत्नशील आहे असेही त्यांनी सांगितले आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी केले आहे, पोलीस विभाग काम करीत असताना महिलांच्या सुरक्षितेला नेहमी प्रधान्य देत आहे, यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी रूपाली चाकणकरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले, यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिला आर्थिंक विकास महामंडळामार्फत तयार करण्यात आलेल्या सक्षम या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link