वाढदिवस विशेष | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज| प्रतिनिधी : संजय हिवाळे
जीवन हा एक दागिना आहे. त्याला प्रेम रुपी सागराने सजवून, त्याचा विश्वरूपी डोंगर निर्माण करून, आपण आपल्या जीवनामध्ये नवलौकिक साधावा… आपल्यासाठी प्रत्येक उगवणारा दिवस तेजोमय, गतिशील, आणि प्रगतीदायक ठरावा.. त्याचबरोबर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद काहींच्या प्रेरणा, काहींच्या उत्तेजना, स्वयस्फूर्ती अशा राजकीय, सामाजिक समीकरणातून, तसेच जन माणसाच्या सुखदुःखात सहभागी होऊन. जनसंपर्क हेच विजयाचे माध्यम समजून, व्यक्तीची जाण, व जनतेची आवड ,हे सर्वस्व मानून, विवेकी विचाराने चालत राहावे.. आपल्या जीवनातील हीच ,यशाची उत्तम पावती होय.. भाऊ आपली कारकीर्द ही अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे. आतापर्यंत निराशेत अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीला.व आपल्या हक्काच्या कार्यकर्त्याला, आपनातून आशेचा किरण दिसू लागलेला आहे. भाऊ आपल्या संघर्षमय जीवनातून दुःखी माणसाच्या अश्रूचे फुले व्हावीत, अशी अनेक व्यक्ती आशा बाळगून आहेत.
भाऊ आपली कारकीर्द अथांग महासागरातून सहज विमानरूपी पंख पसरून, विशाल रुपी क्षेत्रातून जाण्याची शक्ती आपणास प्राप्त होवो. आपणास महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळो. भाऊ आपल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, पारिवारिक, जीवनात उदंड आयुष्य… राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब प्रदान करो. हीच जन्म वाढदिवसानिमित्त सदिच्छा, शुभेच्छा.
