धुळे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
धुळे महानगरपालिका, साईकला बहुउद्देशीय संस्था, धुळे आणि जनमत महाराष्ट्र न्यूज चॅनल यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचे महत्त्व पटवून देणारा हा उपक्रम शहरातील विविध ठिकाणी प्रभावीपणे राबविण्यात आला.
यामध्ये संतोषी माता चौक, दत्त मंदिर चौक, विटा भट्टी, स्वस्तिक चौक, झाशी राणी पुतळा, आग्रा रोड, नगावबारी या महत्त्वाच्या ठिकाणी लोकांना एकत्र करत त्यांच्या एका मताचे महत्व पटवून देत येणार्या 20 तारखेला स्वत: सह शेजार्यांना घेऊन मोठ्या संख्येने विधानसभा निवडणुकीसाठी आपले मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मतदान हा केवळ अधिकारच नाही, तर कर्तव्य असल्याचा संदेश दिला. या अभियानाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. आणि येणार्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा निश्चय व्यक्त केला.
या अभियानात साईकला बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद सोनवणे, जनमत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक विनय हिरे, शुभम धांडे, सोहम कोळी, आणि तेजस शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि अनेकांनी आगामी निवडणुकांमध्ये नक्की मतदान करण्याचा संकल्प केला.