पुणे शहर| अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | संपादकीय
पुणे शहरातील परिमंडळ 1 ते 5 हद्दीत दि.14.11.2024 ते 16.11.2024 रोजी तीन दिवसांमध्ये एकूण 1,513 गुन्हेगार पोलीस स्टेशन स्तरावरती चेक करण्यात आले आहे**
तसेच रात्री परिमंडळ हद्दीत कोंबिंग नाकाबंदी आणि पेट्रोलिंग दरम्यान रोज रस्त्यावरती उनाडक्या करत फिरणाऱ्या टावळखोर मुलांना देखील पोलीस स्टेशनमध्ये आवश्यक त्या कायदेशीर कारवाईसाठी घेऊन जाणार आहे . त्यामुळे कोणीही कामाव्यतिरिक्त उगाचच असामाजिक तत्त्वांसारखे बाहेर फिरून सार्वजनिक शांततेचा भंग करणारे कृत्य करत बसू नये. आदर्श आचार संहितेचं आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 37(1)(3) याचं कलमांचे उल्लंघन होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. यामध्ये कायदेशीर कारवाई करत असताना महाराष्ट्र पोलिस कायदा 135, भारतीय न्याय संहिता 189(2), मोटर वाहन कायदा, इत्यादी तत्सम कायद्यान्वये गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होणार नाही, आदर्श आचारसंहिता अबाधित राहील यासाठी सर्व नागरिकांना पुणे शहर पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येत आहे.