एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

मुंबईच्या दर्या सागराच्या मालकांचा (कोळी बांधवांचा) अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा

मनसे | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : हंसराज पाटील 

मनसेचे उमेदवार श्री अमित ठाकरे हे सातत्याने आपल्या निवडणुक प्रचारात स्वच्छ समुद्र किनारा आणि कोळी बांधवांच्या समस्यांच्या प्रती चिंता व्यक्त करून त्यांचे मूळ प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगत आहेत. त्यांनी आपल्या वचननाम्यात सुद्धा स्वच्छ समुद्र किनारे आणि माहीम मच्छीमार कॉलनी वसाहतीच्या दुर्दशा यांचा मुद्दा प्राधान्याने सोडविणार असल्याचे नमूद केले आहे.

कोणत्याच पक्षाने कधीही कोळी समाजाबद्दल अशी आत्मीयता कधीच बोलून दाखवली नाही. त्याचबरोबर आमच्या कोळी समाजाच्या समस्या पण तश्याच वर्षानुवर्षे सरकारी कार्यालयात खितपत पडल्या आहेत. पण अमित ठाकरे यांच्या रूपाने कोळी समाजाला एक आश्वासक चेहरा मिळाला असून तो नक्कीच यासाठी काम करेल, असा विश्वास व्यक्त करीत अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. मनसे सहकार सेना राज्य कार्यकारिणी सदस्य प्रवीण चव्हाण यांनी अशी माहिती दिली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link