एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महाराष्ट्र स्वराज्य पक्षा ची भव्य दिव्य शक्तिप्रदर्शन आणि विजयाची रणनीती

राजकीय घडामोडी | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | ठाणे जिल्हा : प्रतिनिधी गणेश दळवी.

महाराष्ट्र स्वराज्य पक्षा ची भव्य दिव्य शक्तिप्रदर्शन आणि विजयाची रणनीती. अंकुश (बाबा) कदम यांच्या नेतृत्वाखाली दिग्गज रॅली, श्री,संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती होती.

आज नवी मुंबई, येथे ९ नोव्हेंबर २०२४:रोजी नवी मुंबई मधील १५० ऐरोली विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या निवडणुकीत आपले स्थान मजबूत व बळकट करताना,एक ताकदवान स्वराज्याच्या शिलेदार उमेदवार अंकुश (बाबा) कदम यांनी मोठ्या उत्साहाने शक्तिप्रदर्शनाचे आयोजन केले. यामध्ये दिघा ते वाशी दरम्यान भव्य बाईक रॅली काढण्यात आली, ज्यात हजारो स्वराज्य समर्थकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ही रॅली अंकुश (बाबा) कदम यांच्या नेतृत्वातील लोकप्रियतेचा आणि जनसामान्यांच्या व्यापक समर्थनाचा स्पष्ट दाखला देणारी ठरली आहे.

या भव्य शक्तिप्रदर्शनात “महाराष्ट्र स्वराज्य पक्षा चे पक्ष”प्रमुख सन्माननीय श्री,संभाजीराजे छत्रपती राजे यांनी प्रमुख म्हणून उपस्थिती लावली. श्री. संभाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती रॅलीसाठी विशेष प्रेरणादायक विश्वासदाई ठरली आणि त्यांच्या मार्गदर्शनाने रॅलीमध्ये युवा तरुणाचा प्रचंड उत्साहाचा नवा रंग भरला. श्री,संभाजीराजे छत्रपती राजे हे महाराष्ट्रातील युवा पिढीचे तरुणांचे प्रेरणास्त्रोत असून, त्यांचे विचार व मार्गदर्शन प्रत्येकासाठी प्रोत्साहन करणारे विजयाकडे घेऊन जाणारे आहे.

दिघा ते वाशी मार्गावर स्वराज्याचे भगवे भव्य शक्तिप्रदर्शन

हे शक्तिप्रदर्शन दिघा ते वाशी या मार्गावर पार पडले. मोटरसायकल रॅलीचे माध्यमातून समर्थकांनी अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वातील लोकांना विश्वास देत त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. या रॅलीमध्ये स्थानिक रहिवाशांचा प्रतिसाद मोठा असून, त्यांचे समर्थन “अंकुश सखाराम कदम” यांना विश्वास देणारी लाभदायी ठरणारी आहे. ऐरोली मतदारसंघात या शक्तिप्रदर्शनाची चर्चा प्रत्येक लोकांच्या मनात नवीन “सुसंस्कृत स्वराज्य” निर्माण करणारी ठरेल.

एक नाव इतिहास घडेल एक नवा सुसंस्कृत स्वराज्य स्थापन होईल.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link