राहुल आहेर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : दयानंद सोनवणे.
चांदवड येथे डॉ राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेऊन केदा नाना आहेर यांना उमेदवारी मिळावी या साठी मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे मागणी केली आहे. मागणीला वरीष्ठ नेत्यांनी हिरवा कंदील दिला आहे. महायुतीकडून ही जागा भाजपाला मिळाल्या नंतर महायुतीचे उमेदवार केदा नाना आहेर असणार हे या प्रसंगी डॉ राहुल आहेर यांच्या कडुन घोषित करण्यात आले गेल्या 10 वर्षात केदा नानांनी मोठे मन करून मला उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले होते त्यामुळे या वेळेस केदा नाना यांना संधी देण्यात आली असे या प्रसंगी नमूद करण्यात आले आहेर कुटुंब गेल्या 40 वर्षा पासून राजकारणात आहे आमचे कुटुंब सतत एकत्र राहून निर्णय घेते त्यामुळे राजकारणा पलीकडे पण कुटुंब व्यवस्था आहे. ती टिकली पाहिजे तसेच या विधांसभेमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून येऊन सत्ता महायुतीला मिळावी या साठी किती पण त्याग करायला तयार आहे असे या प्रसंगी नमूद करण्यात आले.राज्यात विधानसभा निवडणूका जाहीर झाल्या असून नाशिकच्या चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपच्या तिकिटासाठी विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर व नाफेडचे संचालक केदानाना आहेर या दोन भावांमध्ये उमेदवारी वरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत होती. अशातच आमदार राहुल आहेर यांनी विधानसभा निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याच. पत्रकार परिषदेत राहुल आहेर यांनी ही घोषणा केली.
सविस्तर…
🛑चांदवड-देवळा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच…
गेल्या दोन पंचवार्षिकांपासून चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात डॉ. राहुल आहेर हे भाजपाचे आमदार आहेत. परंतु यावर्षी तिकिटासाठी या भागात त्यांना त्यांचे बंधू, नाफेडचे संचालक व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्यामध्ये उमेदवारीवरून राजकारण रंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केदा नाना आहेर यांनी जोरदार तयारी सुरू करत मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे. त्याचबरोबर विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गावागावातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी बैठका सुरू झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत आहेर भावांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळते की काय? अशी स्थिती निर्माण झाली होती.
🛑डॉ. राहुल आहेर मध्य नाशिक मधून लढणार…
अशातच डॉ. राहुल आहेर यांनी पत्रकार परिषद घेत चांदवड- देवळा मतदार संघातून माघार जाहीर केल्याने केदा आहेरांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच राहुल आहेर यांनी पक्षाला केदा आहेराना उमेदवारी देण्याची वरिष्ठांकडे मागणी देखील केली आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार, राहुल आहेर मध्य नाशिक मधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.