कामगार संघटना | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | कार्यकारी-संपादक : किरण सोनवणे.
राष्ट्रीय किसान जनरल कामगार संघटना कार्यालयास, राष्ट्रीय धर्म हिन्दू संघटना राज्य कार्यकारिणी सदस्यांनी दिली सदिच्छा भेट..
राष्ट्रीय किसान जनरल कामगार संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष व माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा सह सचिव तसेच दैनिक चालू वार्ता हवेली तालुका प्रतिनिधी.
श्री परशुराम मोरे यांच्या कार्यालयात जाऊन राष्ट्रीय धर्म हिंदू संघटन अध्यक्ष हंसराज पाटील उपाध्यक्ष गोपाळ भालेराव कोषाध्यक्ष संतोष लांडे सचिव अमोल सोमवंशी यांनी सदिच्छा भेट घेतली. व सध्या कंत्राटी कामगार, सुरक्षा रक्षक, रोजगार निर्मिती,बांधकाम कामगार, अकुशल कामगार शिष्य वृत्ती योजना यांच्या व यांच्या कुटुंबातील सर्व सदस्याच्या विविध समस्यांच्या निवारणा विषयी व शासकीय योजना यांच्या पर्यत कश्या पोहोचवता येईल जेणेकरून, कामगारांना व त्यांच्या मुलां ,बाळानां याचा लाभ होईल.
यासाठी तालुका स्तरापासून ते जिल्हा पातळीवर कार्य करण्याचे ठरले व सर्वं सामान्य लोकापर्यंत तळागाळा पर्यंत सर्वांना माहिती देवून संघटन वाढवून एकोप्याने काम करुण सर्वसामान्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करू व राष्ट्र हिताचे काम करू अशी माहिती आमच्या प्रतिनिधिला देण्यात आली.
