मधु तारा | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | मुख्य-संपादक : संतोष लांडे/किरण सोनवणे.
मधु तारा फाऊंडेशनचे यश.लवकरच सेवाग्राम रेल्वे स्थानकावर जिल्हा वर्धा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र.
नागपूर डी आर एम ऑफिस कमर्शियल विभाग उच्च अधिकारी श्री अमर मित्तल सर यांनी मधु तारा सोबत जुडून सेवाग्राम रेल्वे स्थानकावर रुग्ण प्रवाशी तसेच दिव्यांगांसाठी प्राथमिक तत्त्वावर उपचार केंद्र सुरू करण्या बाबत तीन महिन्या पूर्वी ईच्छा व्यक्त केली. आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी मधु तारा यांच्या अथक प्रयत्नाने दत्ता मेघे सावंगी हॉस्पिटल वर्धा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सूप्रिडेंट डॉ श्री चंद्रशेखर महाकाळकर यांनी मधु ताराच्या प्रस्तावास मान्यता दिली व आपल हॉस्पिटल या कार्यात पुढाकार घेऊन कार्य करेल असे पत्र दिले लवकरच या विषयावर सविस्तर डी आर एम ऑफिस नागपूर बैठक घेऊन मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन नागपूर डी आर एम ऑफिस कमर्शियल विभाग व सावंगी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम रेल्वे स्थानकावर प्राथमिक तत्त्वावर उपचार केंद्र सुरू करण्यात येईल असे श्री अमर मित्तल यांनी ग्वाही दिली.
