एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जुन्नर मध्ये पर्यटन तालुक्याला साजेल असे बसस्थानक होणार

जुन्नर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी – प्रशांत काजळे.

जुन्नर नवीन बसस्थानकाच्या पुनर्बाधणीसाठी ९ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती ९ पुणे म्हाडाचे अध्यक्ष व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली. जुन्नर शहरातील बसस्थानकाची झालेली दुरवस्था पाहून बस स्थानकाची पुनर्बाधणी करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. जुन्नर पर्यटन तालुक्याला साजेल, असे बसस्थानक असावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करून व प्रत्यक्ष भेट घेऊन कामाचे महत्त्व पटवून दिले. त्यानुसार महायुती सरकारच्या माध्यमातून या कामाला निधी मंजूर झाला आहे.

बसस्थानकाचे कामात प्रामुख्याने तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकाम फलाट, वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण खोली, पास विभाग, पार्सल ऑफीस, चालक/ वाहक विश्रांतीगृह, महिला विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, प्रसाधनगृह आदी विकासात्मक कामाचा समावेश आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा व सांडपाणी, काँक्रिट वाहनतळ, विद्युत विषयक कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फायर फायटिंग, संरक्षक भिंत अशी विविध कामे करण्यात येणार असल्याचे आढळराव यांनी सांगितले.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link