अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज.
ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर यांच्या ‘मु. पो. वडाचे म्हसवे ते यूएसए’ या आत्मचरित्राचे प्रकाशन.
‘यू टर्न’सहीत २५ व्यावसायिक नाटकं, १५ प्रायोगिक नाटकं, ४२ एकांकिका, ‘जन्म’, ‘आम्ही बोलतो मराठी’सहीत १४ चित्रपटांसाठी कथा-पटकथा-संवाद लेखन, १२ दूरदर्शन मालिकांसाठी २५०० हून अधिक भागांचं लेखन, एका कवितासंग्रहासहीत आणि इतर पाच पुस्तकं एवढी विपुल साहित्यसंपदा ज्यांच्या लेखणीतून उतरली ते ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर यांचं ‘मुक्काम पोस्ट वडाचे म्हसवे ते यूएसए’ हे आत्मचरित्र ‘ग्रंथाली प्रकाशना’तर्फे प्रकाशित होणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे, लोकप्रिय नाट्य-चित्रपट अभिनेता विजय गोखले, रसिकमान्य नाटककार-दिग्दर्शक-अभिनेता संतोष पवार आणि ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे. आनंद म्हसवेकर यांच्या या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा रविवार, १३ ऑक्टोबर, २०२४ रोजी दुपारी ४.०० वा., दादर माटुंगा कल्चरल सेंटर (यशवंत नाट्यगृहाशेजारी), माटुंगा येथे आयोजित करण्यात आला आहे.
रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य असून मु.पो.वडाचे म्हसवे ते यूएसए हे आत्मचरित्र या दिवशी सवलतीच्या दरात उपलब्ध असेल.