एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अनैतिक संबंधातून आईने प्रियकरांच्या मदतीने केला मुलाचा खून, लोणीकंद पोलिसांनी आईसह प्रियकरांला ठोकल्या बेड्या.

पुणे ‌| अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी.

अनैतिक संबंधातून आईने प्रियकरांच्या मदतीने केला मुलाचा खून, लोणीकंद पोलिसांनी आईसह प्रियकरांला ठोकल्या बेड्या, संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर ) प्रतिनिधी. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या आईनेच आपल्या प्रियकरांच्या मदतीने मुलाच्या डोक्यांत दगड घालून खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात घडली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आईसह प्रियकरांला बेड्या ठोकल्या आहेत. अनिल लालसिंग ठाकूर (वय 30) असे खून झाल्याचे खून नाव आहे, याप्रकरणी अनिलची आई सुमित्रा लालसिंग ठाकूर (वय 55 ) रा.वाघमारे वस्ती पेरणे फाटा नगर रस्ता) आणि तिचा प्रियकर प्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय 34 ) रा. वाघमारे वस्ती पेरणे फाटा नगर रस्ता ) या दोघांनाही लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अनिलचा भाऊ सुनील ठाकूर (वय 32) याने याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून सुमित्रा आणि तिची मुले सुनील अनिल मुळचे उत्तर प्रदेशातील आहेत ते मोल मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाहासाठी पेरणे फाटा परिसरांतील वाघमारे वस्ती भागात राहायला आहेत. याच वस्तीत राहणाऱ्या आरोपी प्रफुलशी अनिलची आई सुमित्रा हिच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर त्यांचे प्रेमात त्यानंतर त्यांच्या दोघात अनैतिक संबंध निर्माण झाले, या दोघांचे अनैतिक संबंधाची कुणकुण मुलगा अनिल लागली होती. अनिलचे आणि आईचे जोरदार भांडणे झाली होती. बुधवारी मध्यरात्री सुमित्रा व तिचा प्रियकर प्रफुल्ल ताथोड या दोघांनी अनिलला शिवीगाळ करून मारहाण केली त्यांनी त्याच्या डोक्यात दगड घातला गंभीर जखमी झालेल्या अनिलला तातडीने रुग्णालय दाखल करण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली, पुढील तपास स.पो.नि.घोरपडे करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link