लातुर | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज | प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी (सातारा शहर)
लातूर मधून पुण्यात येवुन घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या विश्रांतवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, विश्रांतवाडी पोलिसांची दमदार कामगिरी, संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर ) प्रतिनिधी. पुण्यात घरफोडीचे सत्र सुरू असताना विश्रांतवाडी पोलिसांनी लातूरहून येवुन पुण्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेखर संभाजी जाधव (वय 25) रा मोघा ता. उदगीर जि. लातूर ) असे आरोपींचे नाव आहे, सदर आरोपींच्या कब्जांतून त्याच्याकडूंन 3 लाख 85 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, विश्रांतवाडी पोलीस ठाणेकडील तपासी पथक हद्दीतील घरफोड्या चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत करीत होते. पोलीस अंमलदार संजय बादरे अमजद शेख वामन सावंत व किशोर भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत प्राप्त माहिंतीच्या आधारे घरफोडीतील आरोपी शेखर संभाजी जाधव सध्या मोघा या गावी आहे. त्यानुसार पोलीस पथक लातूर जिल्ह्यातील मेघा या गावी जावुन शेखर जाधव यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली. यामध्ये मोबाईल पावर बँक व कार चार्जर असा 1 लाख 43 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर आरोपीकडून मुंढवा चंदननगर भोसरी हडपसर पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव ( गुन्हे पोलीस निरीक्षक ) शंकर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड पोलीस अंमलदार बबन वणवे यशवंत किर्वे कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बादरे संपत भोसले संदीप देवकांते अक्षय चपरे किशोर भुसारे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.