अजिंक्य महाराष्ट्र न्यूज : प्रतिनिधी सतीश कडू.
नागपूर : आक्रमण युवक संघटना, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) मूलनिवासी विद्यार्थी संघटना, ऑल इंडिया दलित पॅंथर सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेडकरी आंदोलनाचे युवा प्रख्यात चेहरा व बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष तळागाळातील जन समस्यांना धावून जाणारे.
युवा विद्यार्थी ओपुल रामदास तामगाडगे यांचे उमेदवारी दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात जाहीर झाली आहे.
ओपुल तामगाडगे हे एक गरीब कुटुंबातील रामबाग इमामवाडा या स्लम क्षेत्रात रहिवासी असून त्यांचे वडील कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी हात रिक्षा चालवायचे आणि सर्वप्रथम त्यांच्या वडिलांनी नागपूरच्या बस स्टॅन्ड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा लावलेत अशा या संघर्षमय वडिलांचे कार्य आंबेडकरी आंदोलनाच्या माध्यमातून जनसामान्य गोरगरीब विद्यार्थी, कामगार हातमजुर यांच्याकरिता ते आक्रमण युवक संघटनेचे माध्यमातून त्यांना न्याय देण्याच्या प्रयत्न करीत असतात. त्यांचे शिक्षण एम ए मराठी लिटरेचर मध्ये झाले असुन त्यांच्या या उमेदवारीमुळे तळागाळातील सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन व त्यांचे स्वागत.







