– प्रतिनिधी प्रशांत काजळे.
हडपसर मोक्का कारवाई केल्यानंतर गेल्या १० महिन्यापासून फरार असलेल्या टोळी प्रमुखास पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे.
सुरज ऊर्फ चुस बाळू मोहिते वय- २२, रा. मार्केडेयनगर, अण्णाभाऊ साठे हॉलजवळ, वैदुवाडी,हडपसर असे या टोळीप्रमुखाचे नाव आहे.
तक्रार दिल्याच्या रागातून १५ जणांच्या टोळक्याने वैदुवाडी येथील एकाच्या घरावर हल्ला करुन परिसरातील वाहनांची व दुकानांची तोडफोड केली होती. तसेच हातातील शस्त्राने वार करुन सुरज ऊर्फ चुस मोहिते याच्या टोळीने परिसरात दहशत माजविली होती. तत्कालीन पोलीस आयुक्त रितेशकुमार यांची जानेवारी २०२४ मध्ये सुरज मोहितेसह १५ जणांच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. या कारवाईतील ९ जणांना पोलिसांनी अटक केली. ५ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते.
सुरज मोहिते हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता. तो मिळून येत नव्हता. त्याच्या राहत्या पत्त्यावर वेळोवेळी तसेच इतरत्र मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेतला असताना तो मिळून आला नव्हता. आरोपीविषयी कोणतीही उपयुक्त माहिती मिळून येत नसताना हडपसर तपास पथक अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे, तपास पथक अंमलदार अतुल पंधरकर, अमित साखरे, तुकाराम झुंजार यांच्या पथकाने कौशल्यपूर्वक आरोपीची माहिती गोळा करुन त्याला १९ सप्टेबर रोजी अटक केली. न्यायालयाने त्याची २३ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख तपास करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उपनिरीखक महेश कवळे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर, पांडुळे, सचिन जाधव, दिपक कांबळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, चंद्रकांत रेजितवाड, अतुल पंधरकर, अमित साखरे, निलेश किरवे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार यांच्या पथकाने केली आहे.