ई-बाईक टॅक्सी धोरणाविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा!
प्रतिनिधी माहलिंग स्वामी
छावा वाहन चालक मालक कामगार संघाचा मोठ्या संख्येने सहभाग; न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार!
पुणे : राज्य सरकारच्या ई-बाईक टॅक्सी धोरणाविरोधात रिक्षा पंचायतचे अध्यक्ष श्री. नितीन पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित धडक मोर्चामध्ये छावा वाहन चालक मालक कामगार संघाने उत्स्फूर्त व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थापक उपाध्यक्ष श्री. लक्ष्मणभाऊ शेलार, प्रदेशाध्यक्ष श्री. सोमनाथभाऊ कलाटे, शहराध्यक्ष श्री. हिरामण शेठ गावरे, राज्य संघटक श्री. समीर नामदार, संस्थापक सचिव श्री. स्वप्नील भालेकर, शहर उपाध्यक्ष श्री. संजय अण्णा दौंडकर राज्य खजिनदार श्री. विनायक ढोबळे, प्रवक्ते श्री. अविनाश जोगदंड, श्री राज्याचे नेते गाडे साहेब श्री. चेतन राऊत, पुणे शहर नेते श्री. महालिंग स्वामी, व त्यांची टीम सहभाग घेतला श्री रामदास वंजारे श्री शिवाजी बिरादार श्री काळुराम थोपटे श्री समीर इनामदार यांचे नेतृत्वाखाली हिंजवडी टीमच्या वतीने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या टीमसह मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
विशेषतः छावा वाहन चालक मालक कामगार संघाचे प्रवक्ते श्री. अविनाश जोगदंड यांनी वैशिष्ट्यपूर्ण घोषणांनी आंदोलनामध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या जोशपूर्ण घोषणांमुळे आंदोलनस्थळी रिक्षाचालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांचा आक्रमक इशारा!
“वैयक्तिक प्रवासासाठी असलेल्या दुचाकी वाहनांना व्यावसायिक प्रवासी वाहतुकीचे साधन बनवून रिक्षाचालकांच्या रोजगारावर गदा आणणारे धोरण आम्ही कदापि स्वीकारणार नाही. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या नावाखाली आधीपासून रोजगार करणाऱ्या कष्टकरी रिक्षाचालकांना बेरोजगार करणारे सरकारचे धोरण अन्यायकारक आहे. भांडवलदारांच्या हितासाठी गरीब रिक्षाचालकांच्या कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त होऊ देणार नाही. रिक्षाचालकांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष अविरत सुरू राहील!”
असा ठाम इशारा संस्थापक अध्यक्ष श्री. बाळासाहेब ढवळे यांनी दिला.
आझाद रिक्षा चालक संघटनेचे नेते श्री. शफीकभाई पटेल यांनीही रिक्षाचालकांना बेरोजगार करणाऱ्या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला. तर रिक्षा पंचायतचे अध्यक्ष श्री. नितीन पवार साहेब यांनी रिक्षाचालकांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्यपूर्ण संघर्ष करण्याची भूमिका मांडली.
न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच!
रिक्षाचालकांच्या रोजगाराचे संरक्षण, त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची हमी आणि अन्यायकारक ई-बाईक टॅक्सी धोरणाचा पुनर्विचार व्हावा, या मागणीसाठी छावा वाहन चालक मालक कामगार संघाने ठाम भूमिका घेतली.
संभाजी ब्रिगेड चे नेते निलेश कांबळे , शहराचे नेते श्री रुपेश घोटकुले , , विभागीय अध्यक्ष श्री विशाल चव्हाण, विजय मळेकर ,सतीश सुरवसे ,मनोज राऊत ,गोरख लोंढे ,सुधीर पांचाळ ,राकेश खिलारे, निलेश कांबळे ,प्रवीण ठोंबरे ,संतोष पडघान ,प्रमोद नांगरे ,अक्षय सकट ,पप्पू गवारे ,उत्तम मेमाणे ,अनंता बधाले ,अभिमन्यू बाळू कळसकर ,अनंता गिरी ,सुहास शिंगोटे ,सुनील जाधव , सत्यवान क्षीरसागर,प्रमोद जुनावणे , संपत भालेराव, अतुल मिसाळ ,राजाभाऊ मोहिते ,अरुण राठोड ,अप्पा जाधव ,नंदकुमार बोरगे ,सोमनाथ आवारे ,बंटी ठोकळे ,जुबेर सय्यद ,महेश आवारे ,शिवदास मोहिते ,योगेश नाईकवडे ,ब्रिज पाल सिंह ,राजपूत सुनील ,भाऊ चोरगे ,अखिल शेख,रुपेश घोटकुले भगवान टकले विशाल चव्हाण ,दादा गुंजाळ ,गणेश घोटकुले ,श्रीधर राठोड ,सुहास मुंडे ,राजेंद्र तुरे ,ज्ञानेश्वर मोरे ,उमेश विश्वकर्मा ,मुकेश वर्मा ,अरविंद चव्हाण ,आकाश जाधव ,गणेश धुमाळ ,महेश किवळे ,संजय गाजरे, दिलीप लोखंडे ,श्रीधर पोतदार ,अरुण मगरे,
मराठी रिक्षा चालक सेनेचे सचिन माने,
रिक्षाचालकांचा रोजगार वाचलाच पाहिजे!
रिक्षाचालकांना न्याय मिळालाच पाहिजे!
अन्यायकारक ई-बाईक टॅक्सी धोरणाचा निषेध असो







